कडक सॅल्युट! अग्निशमन दलाच्या जवानानं जिंकली मनं; जीवाची बाजी लावून आगीतून 'तिरंगा' काढला बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 03:46 PM2023-01-20T15:46:07+5:302023-01-20T15:48:52+5:30
अग्निशमन दलातील जवानाच्या धाडसाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : देशाचा राष्ट्रध्वज हा अभिमान आणि शौर्याचे प्रतिक आहे. भारतीय जवान तिरंग्याच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र झटत असतात. तिरंग्यावर कोणतीही आपत्ती आली की देशवासीय त्यासाठी जीव धोक्यात घालायलाही तयार असतात. असाच काहीसा प्रकार हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यात पाहायला मिळाला. खरं तर इथे अग्निशमन दलात तैनात असलेल्या भटनागर कॉलनी जींद येथील रहिवासी फायरमन सुनील मेहला या जवानाने आपल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली.
दरम्यान, शहरातील भारत नगर येथील सूतगिरणीला भीषण आग लागली होती. आगीने संपूर्ण परिसराला विळखा घातला होता. मात्र, इमारतीच्या वरच्या बाजूस तिरंगा डौलाने फडकत होता. हळूहळू आगीने रौद्ररूप धारण करत तिरंग्याकडे कूच केली. एवढ्यात अग्निशमन दलाच्या जवानाने धाडस दाखवून तिरंग्याचे रक्षण केले.
फ़ैक्ट्री में लगी आग , पर तिरेंगे पर नहीं लगने दिया कोई दाग ..
— Neelkant Bakshi 🇮🇳 (@neelkantbakshi) January 19, 2023
फायर ब्रिगेड के इस साथी को प्रणाम 👍
जय हिन्द 🙏 pic.twitter.com/fDcVJRi3n7
जवानानं जिंकली मनं
खरं तर जवानाने आपल्या जीवाची बाजी लावून आगीतून तिरंगा बाहेर काढला. आगीच्या वेळी मिलच्या मुख्य गेटच्या छतावर तिरंगा फडकत होता. तेवढ्यात जवान सुनील यांची नजर तिरंग्यावर पडताच त्याने जीव धोक्यात घालून तिरंग्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. काही वेळातच तिरंगा सुरक्षितपणे खाली उतरवून आदराने शेजारील कारखान्यात ठेवण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून नेटकरी या जवानाला सलाम ठोकत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"