"तुम्ही खूप क्युट आहात", मुलीनं दिला Flying Kiss, शास्त्रींची रिॲक्शन Viral; दिली भन्नाट प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 01:54 PM2024-01-27T13:54:21+5:302024-01-27T13:56:24+5:30
धीरेंद्र शास्त्री त्यांच्या विधानांमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतात.
बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री त्यांच्या विधानांमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतात. मध्य प्रदेशशिवाय इतरही राज्यांमध्ये त्यांचा दरबार भरतो. सध्या शास्त्री छत्तीसगड दौऱ्यावर असून तिथे त्यांचा दरबार भरला आहे. यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खरं तर दरबारात शास्त्रींना एका तरूणीने फ्लाईंग किस दिला, ज्यावर शास्त्रींनी भन्नाट प्रतिक्रिया दिली.
छत्तीसगड दौऱ्यावर असलेल्या धीरेंद्र शास्त्रींनी दरबारात भक्तांशी संवाद साधला. यावेळी चर्चेसाठी लोकांना एकामागून एक बोलावले जात होते. याच क्रमात एका मुलीनेही बाबांजवळ स्टेजवर पोहोचून धीरेंद्र शास्त्रींना 'फ्लाईंग किस' दिला. फ्लाईंग किसनंतर संबंधित तरूणीने बाबांचे कौतुक केले. मात्र, धीरेंद्र शास्त्रींनी यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनली. यावेळी मुलीने बाबा बागेश्वर यांच्या सौंदर्याचे अनेकवेळा कौतुक केले.
मुलीच्या प्रश्नावर शास्त्रींनी सांगितले की, माझ्या सौंदर्यामुळे मी खूप ट्रोल होत आहे, माझी रोज लग्नं होत आहेत. तू केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद. मी आता मेकअप करणं बंद केलं आहे. लोक माझ्यावर प्रेम करतात ही सगळी बागेश्वर धामची कृपा आहे. संबंधित तरूणीने शिक्षणात येत असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी धीरेंद्र शास्त्रींना उपाय सुचवण्यास सांगितले.
"तुम्ही खूप क्युट आहात"
शास्त्रींसोबतच्या संभाषणात मुलीने बाबांच्या सौंदर्याचे कौतुक केले. चर्चेदरम्यान मुलीने धीरेंद्र शास्त्रींना विचारले की, तुम्ही खूप क्युट आहात, इतके सुंदर कसे काय? यावर उत्तर देताना शास्त्री म्हणाले, "यामुळेच मी अनेकदा ट्रोल होत आहे." यावेळी मुलीने बाबा बागेश्वर यांच्या दरबाराचे कौतुक केले.
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री हे देशातील प्रसिद्ध मठाधिपतींपैकी एक आहेत. मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री त्यांच्या वादग्रस्त तर कधी मजेशीर विधानांमुळे चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. अनेकवेळा बाबांना त्यांच्या वक्तव्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या दरबारावरून राजकारण देखील तापताना दिसते. राजकीय मंडळीही त्यांच्या दरबाराला हजेरी लावते.