भारीच! रामललाच्या मूर्तीचे डोळे मिचकावले! AI चा चमत्कार; रामभक्तांचा आनंद गगनात मावेना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 06:09 PM2024-01-23T18:09:27+5:302024-01-23T18:10:24+5:30
संपूर्ण भारतभर २२ जानेवारी हा दिवस सण म्हणून साजरा करण्यात आला.
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले आहे. संपूर्ण भारतभर २२ जानेवारी हा दिवस सण म्हणून साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी दिवाळीसारखा जल्लोष करण्यात आला. अयोध्याशिवाय इतरही शहरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अभिषेक सोहळ्यात औपचारिकपणे सहभागी झाले. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत हा बहुचर्चित कार्यक्रम पार पडला. सोमवारच्या दिवसाचे आकर्षण ठरले ते रामललाची मूर्ती. रामललाच्या मूर्तीचे दर्शन अभिषेक होण्यापूर्वी सर्व देशवासियांना झाले.
प्रभू श्रीरामाची मूर्ती अतिशय मनमोहक आहे. या ५१ इंचाच्या मूर्तीची झलक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अशातच एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधत आहे, ज्यामध्ये रामलला डोळे मिचकावताना दिसत आहेत. AI च्या माध्यमातून केलेला हा व्हिडीओ सर्वांना भुरळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये रामलला पापण्या मिचकावताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये प्रभू रामाची मनमोहक अभिव्यक्ती दिसते आहे.
Now who did this? 🤩🙏 #Ram#RamMandir#RamMandirPranPrathistha#RamLallaVirajman#AyodhaRamMandir#Ayodhapic.twitter.com/2tOdav7GD6
— happymi (@happymi_) January 22, 2024
दरम्यान, सोमवारी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडला. प्रभू श्रीराम नव्या आणि भव्य-दिव्य मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झाले आहेत. प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर अयोध्येत भाविकांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण अयोध्या नगरी राममय झाली आहे. २२ जानेवारी २०२४ हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी एक ठरला आहे. सोमवारी देशभरात रामललाचा अभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक संदर्भात संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील विविध शहरांमध्ये या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.