देशातील एक असे गाव, जिथे दिवाळी साजरी करत नाहीत, दिवेही लावत नाहीत... रहस्यमयी प्रथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 08:05 AM2022-10-24T08:05:44+5:302022-10-24T08:06:25+5:30

उत्तर प्रदेशातील या गावात दिवाळी साजरी न करण्याची जुनी प्रथा शेकडो वर्षे जुनी आहे, असे द्रौपदी देवी या वृद्ध महिला सांगतात.

A village in the country, where Diwali is not celebrated, lights are not lit... | देशातील एक असे गाव, जिथे दिवाळी साजरी करत नाहीत, दिवेही लावत नाहीत... रहस्यमयी प्रथा...

देशातील एक असे गाव, जिथे दिवाळी साजरी करत नाहीत, दिवेही लावत नाहीत... रहस्यमयी प्रथा...

googlenewsNext

भगवान राम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते, त्या दिवशी त्यांच्या स्वागतासाठी दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली होती. यामुळे आजच्या दिवशी देशभरात दिवे लावले जातात. मात्र, त्याच उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात एक गाव असा आहे, जिथे अनेक वर्षांपासून दिवाळीच्या दिवशी दिवे लावले जात नाहीत. दिवाळीच्या दिवशी या गावात एक घटना घडली होती. एक तरुण याच दिवशी मृत झाला होता. यामुळे या गावात या दिवशी दुखवटा पाळला जातो. 

उत्तर प्रदेशातील गोंडा येथील वजीरगंज विकास गटातील डुमरियाडीहच्या यादवपुरवा गावात दीपावलीचा सण साजरा केला जात नाही. स्वातंत्र्यानंतर इथले लोक दिवाळीला कोणताही सण साजरा करत नाहीत. गावातील लोक सांगतात की दिवाळीच्या दिवशी एका तरुणाचा मृत्यू झाला होता, तेव्हापासून आम्ही हा सण साजरा करत नाही. मन वळवण्याचा प्रयत्न केला तर काहीतरी अनुचित घडते. त्या भीतीचा प्रभाव आजही कायम आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. 

गावातील राजकुमार यादव यांनी सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी सणाच्या दिवशी एका तरुणाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर ही येथे परंपरा बनली. तीच परंपरा पिढ्यानपिढ्या चालू आहे. या गावात 20 घरे आहेत. एकूण 250 लोक त्यात राहतात. या सणाच्या दिवशी हे सर्व लोक घरीच राहतात. कुठलाही फराळ बनत नाही, की कुठलाही उल्हास नसतो.

काही वेळा आलेल्या नवीन सुनांनी ही परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला. त्याचा आम्हालाही फटका सहन करावा लागला. अनेक लोक आजारी पडले. मुलेही खूप त्रस्त झाली. लोक हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत राहिले. काही झाले तरी दिवाळी साजरी केली जाणार नाही, असे ठरविण्यात आले. दुसऱ्या दिवशी मुले फटाके वगैरे फोडतात, पण त्या दिवशी नाही, असेही राजकुमार म्हणाले. 

दिवाळी साजरी न करण्याची जुनी प्रथा शेकडो वर्षे जुनी आहे, असे द्रौपदी देवी या वृद्ध महिला सांगतात. दिवाळीच्या दिवशी गावात मुलगा जन्माला येईल किंवा गायीचे वासरू जन्माला येईल, मगच हा सण सुरू होईल. याची या गावातील लोक वाट पाहत आहेत. पूर्वजांनी या दिवशी दिवाळी साजरी करू नये असे आम्हा लोकांना सांगितल्याचेही त्या म्हणाल्या. 
 

Web Title: A village in the country, where Diwali is not celebrated, lights are not lit...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.