मुलीचं लग्न राहिलं बाजूला, बाईनं केलं नको ते कांड; होणाऱ्या जावयासोबत...! तुमचा विश्वास बसणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:56 IST2025-04-08T15:55:57+5:302025-04-08T15:56:37+5:30
या महिलेने घरातील पैसे आणि दागिनेही लंपास केले...

मुलीचं लग्न राहिलं बाजूला, बाईनं केलं नको ते कांड; होणाऱ्या जावयासोबत...! तुमचा विश्वास बसणार नाही
उत्तर प्रदेशातील अलीगडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या मुलीच्या लग्नाला ९ दिवस बाकी असतानाच, असे कांड केले आहे की, तुमचा विश्वास बसणार नाही. नात्याच्या मर्यादेला तिलांजली देत ही महिला आपल्या होणाऱ्या जावायासोबतच फरार झाली. एवढेच नाही तर, या महिलेने घरातील पैसे आणि दागिनेही लंपास केले आहेत. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर बेपत्ता झाल्याची नोंद करत, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ही घटना अलीगडमधील मडराक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील एका व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न अलीगडच्याच दादों पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील मुलासोबत निश्चित केले होते. 16 एप्रिलला हे लग्न होणार होते. लग्नासंदर्भातील औपचारिकताही पार पडत होत्या. २ एप्रिल रोजी मुलीच्या पालकांनी पिवळ्या रंगाची एक पत्रिका पाठवली. यानंतर ३ एप्रिलला होणार्या जावयाला एक मोबाईलही भेट म्हणून दिला होता.
बोले जात आहे की, यानंतर मुलीची आई होणाऱ्या जावयासोबत सातत्याने बोलत होती. त्यांचे बोलणे वाढतच गेले. यानंतर दोघे लपून लपूनही बोलू लागले होते. गेल्या रविवारी संबंधित होणारा जावई लग्नाचे कपडे खरेदी करायचे सांगून घरातून बाहेर पडला. यानंतर त्याचा त्याच्या वडिलांना फोन आला. "मी जात आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका," असे म्हणून त्याने फोन कट केला. मुलाचे हे शब्द ऐकूण वडील अस्वस्थ झाले. तरीही घरच्यांना वाटले की, काही समस्या असेल, सायंकाळपर्यंत येऊन जाईल किंवा बोलेल. मात्र असे झाले नाही.
यानंतर, संबंधित तरुणाच्या वडिलांनी मुलाच्या होणाऱ्या सासूरवाडीत फोन केला आणि आपला मुलगा तेथे आला आहे का? असे विचारले. यावर, त्याच दिवशी मुलीची आईही घरातून निघून गेल्याचे समजले. ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. यामुळे मुलीच्या वडिलांनी घरातील कपाट तपासले, तर तेथून सोन्याचे दागिने आणि जवळपास अडीच लाख रुपये लंपास झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.