"जिच्या वडिलांनी अफजल गुरूला वाचवण्याचा प्रयत्नन केला, अशा महिलेला..."; मालीवाल यांचा केजरीवालांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 03:03 PM2024-09-17T15:03:17+5:302024-09-17T15:04:10+5:30
स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे. “आज दिल्लीसाठी अत्यंत दुःख्खाचा दिवस आहे. आज एका अशा महिलेला दिल्लीचे मुख्यमत्री बनवण्यात आले आहे, जिच्या कुटुंबाने दहशतवादी अफजल गुरूला फाशीपासून वाचवण्यासाठी दीर्घ लढाई लढली."
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, आपच्या माजी नेत्या तथा राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. हा दिल्लीसाठी अत्यंत दुःखाचा दिवास असल्याचे स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर त्यांनी आतिशी यांना डमी सीएम देखील म्हटले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे. “आज दिल्लीसाठी अत्यंत दुःख्खाचा दिवस आहे. आज एका अशा महिलेला दिल्लीचे मुख्यमत्री बनवण्यात आले आहे, जिच्या कुटुंबाने दहशतवादी अफजल गुरूला फाशीपासून वाचवण्यासाठी दीर्घ लढाई लढली. त्यांच्या आई-वडिलांनी दहशतवादी अफजल गुरूला वाचवण्यासाठी माननीय राष्ट्रपतींना दया याचिका लिहिली होती."
दिल्ली के लिए आज बहुत दुखद दिन है। आज दिल्ली की मुख्यमंत्री एक ऐसी महिला को बनाया जा रहा है जिनके परिवार ने आतंकवादी अफ़ज़ल गुरु को फांसी से बचाने की लंबी लड़ाई लड़ी।
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) September 17, 2024
उनके माता पिता ने आतंकी अफ़ज़ल गुरु को बचाने के लिए माननीय राष्ट्रपति को दया याचिकाऐं लिखी।
उनके हिसाब से… pic.twitter.com/SbllONqVP0
"देव दिल्लीचे रक्षण करो" -
स्वाती मालीवाल यांनी पुढे लिहिले, "आतिशी यांच्या आई-वडिलांच्या मते अफजल गुरू निर्दोष होता आणि त्याला राजकीय शडयंत्रांतर्गत फसवण्यात आले होते. ते बघितले, तर आतिशी केवळ ‘Dummy CM’ च आहे. तरीही हा मुद्दा देशाच्या सुरक्षिततेसी संबंधित आहे. देव दिल्लीचे रक्षण करो."