बुलेटवरून ऐटीत जात होता तरुण, वाटेत पोलिसांनी अडवले आणि ठोकला ३२ हजार रुपये दंड, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:28 IST2025-02-15T16:27:56+5:302025-02-15T16:28:50+5:30
Traffic Rules: वाहतुकीच्या छोट्या छोट्या नियमांचं उल्लंघन करणं किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून येतोय.

बुलेटवरून ऐटीत जात होता तरुण, वाटेत पोलिसांनी अडवले आणि ठोकला ३२ हजार रुपये दंड, कारण काय?
वाहतुकीच्या छोट्या छोट्या नियमांचं उल्लंघन करणं किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून येतोय. एका इन्स्टाग्राम अकाऊंडवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण पोलिसांसोबत वाद घालताना दिसत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने बुलेटवरून ऐटीत जात असलेल्या या तरुणावर पोलिसांनी तब्बल ३२ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने तो पोलिसांसोबत वाद घालत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अवर ग्वालियर नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ऐटीत जात असलेल्या बुलेटस्वाराला अडवून पोलीस बुलेटची नंबर प्लेट कुठे आहे, असं विचारतात. या बुलेटवर नंबर प्लेटच्या जागी हर्ष असं लिहिलेलं असतं. त्यावरून पोलिस बुलेटन नंबर ऐवजी हर्ष का लिहिलेलं आहे, असा प्रश्न या तरुणाला विचारतात. त्यावर तो सांगतो की, मी ही बुलेट कधी चालवतच नाही. त्यावर एक वर्ष झालं तरी गाडीवर नंबर टाकलेला नाही, म्हणून सदर तरुणाला खडसावतात. आणि तब्बल ३२ हजार रुपयांचा दंड ठोठावतात. तसेच आता बुलेट कोर्टामधून सोडवून ने, असेही सांगतात.
सदर बुलेटस्वार तरुण हा ग्वाल्हेर येथील रहिवासी आहे. तसेच इटावा पोलिसांनी नंबर प्लेटवर नंबरऐवजी स्वत:चं नाव लिहिल्याने त्याच्यावर तब्बल ३२ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे हा तरुण चांगलाच वैतागलाय. उत्तर प्रदेशमध्ये या घटनेमुळे वाहतुकीच्या नियमांकडे लोकांचं लक्ष वळलं असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.