२ वर्षांपूर्वी प्रेम विवाह! काम नसल्यानं पत्नी रूसली अन् पतीनं संपवलं जीवन; सासऱ्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 03:54 PM2023-12-18T15:54:20+5:302023-12-18T15:54:48+5:30

पोलिसांनी मृत केशवची पत्नी कंचनला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. 

A young man who got married two years ago in Bihar's Muzaffarpur has ended his life due to an argument with his wife  | २ वर्षांपूर्वी प्रेम विवाह! काम नसल्यानं पत्नी रूसली अन् पतीनं संपवलं जीवन; सासऱ्याचा गंभीर आरोप

२ वर्षांपूर्वी प्रेम विवाह! काम नसल्यानं पत्नी रूसली अन् पतीनं संपवलं जीवन; सासऱ्याचा गंभीर आरोप

पती पत्नीच्या वादानंतर पतीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बिहारमधील मुजफ्फरपूर येथे घडली. मृत व्यक्तीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढलळा अन् एकच खळबळ माजली. स्थानिकांकडून माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत केशवची हत्या त्याची पत्नी कंचनने केली असून मृतदेह पंख्याला लटकवला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. पोलिसांनी मृत केशवची पत्नी कंचनला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. 

फुलकहा गावातील रहिवासी असलेला केशव नोकरी सुटल्याने गावी लहान मुलांचे क्लासेस घ्यायचा. त्याचे वडील रमाशंकर सिंग हे देखील निवृत्त झाल्यानंतर गावातच वास्तव्यास आहेत. केशवचे दोन वर्षांपूर्वी जवळच्या गावातील कंचनशी प्रेम विवाह झाला होता. कंचनने सांगितले की, दीड वर्षांपूर्वी केशवने तिच्याशी विवाह केला. पण सध्या तो कोणतेच काम करत नव्हता. यावरून दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला. मग ती जवळच्या गावातील एका नातेवाईकाकडे गेली. रात्री केशवने फोन केला असता घरी परत न आल्यास आत्महत्या करेन अशी केशवने धमकी दिली. कंचननं घरी जाणं टाळलं अन् सकाळी मृत्यूची बातमी समोर आली. 

कुटुंबीयांचे गंभीर आरोप 
मृत केशवचे वडील रामा शंकर सिंग यांनी कंचनवर गंभीर आरोप केले. कंचननेच केशवची हत्या केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आमचा त्या दोघांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे ते दोघे भाड्याने खोली घेऊन राहत होते. लग्नाच्या काही दिवसानंतर केशव आणि कंचन यांच्यात वाद होऊ लागला. यामुळे केशव तणावात असायचा. दरम्यान, केशव नोकरी करत असताना त्याची ओळख मोतिहारी येथील कंचनशी झाली. हळू हळू दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि २०२१ मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र, दोघांच्याही घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. विरोधामुळे केशव आणि कंचन यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि भाड्याच्या खोलीत राहू लागले. 

Web Title: A young man who got married two years ago in Bihar's Muzaffarpur has ended his life due to an argument with his wife 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.