मासे पकडायला गेलेल्या तरुणाला अजगराने पकडले, तीन तास चालला जीवन-मरणाचा खेळ, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 11:09 PM2022-10-23T23:09:34+5:302022-10-23T23:15:45+5:30
Jharkhand News: नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचे प्राण अजगराने केलेल्या हल्ल्यामुळे संकटात सापडले. मासे पकडायला गेला असताना या तरुणाला अजगराने पकडले. हा अजगर या तरुणाला गिळण्याचा प्रयत्न कर होता. सुमारे तीन तास हा जीवन मरणाचा खेळ सुरू होता.
रांची - झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचे प्राण अजगराने केलेल्या हल्ल्यामुळे संकटात सापडले. मासे पकडायला गेला असताना या तरुणाला अजगराने पकडले. हा अजगर या तरुणाला गिळण्याचा प्रयत्न कर होता. सुमारे तीन तास हा जीवन मरणाचा खेळ सुरू होता.
ही घटना चिनियामधील खुरी गावात घडली आहे. येथील भुइया टोळीतील सुभाष भुईया सिकरिया नदीच्या किनाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेले होते. यादरम्यान अजगराने त्यांना पकडले. अजगराने त्यांना गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणाने प्रसंगावधान राखून अजगराचं तोंड पकडून ठेवलं. त्यामुळे अजगर त्यांची शिकार करू शकला नाही. आरडाओरडा ऐकून लोक घटनास्थळी आले. त्यानंतर खूप प्रयत्नांती या तरुणाची अजगराच्या तावडीतून सुटका झाली.
ग्रामस्थांनी खूप प्रयत्न करून अगजराच्या विळख्यातून या तरुणाला सोडवले. मात्र तोपर्यंत हा तरुण गंभीर जखमी झाला होता. ग्रामस्थांनी त्य़ाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र आणीबाणीच्या प्रसंगी या तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक होत आहे.
दरम्यान, गावचे सरपंच उदय भुईया यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन या अजगराला ताब्यात घेतले त्यानंतर सदर अजगराची रवानगी जंगलातील अधिवासात करण्यात आली.