अबब, साडेसात हजार उमेदवारांचे अर्ज

By admin | Published: September 29, 2014 07:18 AM2014-09-29T07:18:08+5:302014-09-29T07:18:08+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघातून सुमारे ७ हजार ६६६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

Aab, 7,000 applicants' application | अबब, साडेसात हजार उमेदवारांचे अर्ज

अबब, साडेसात हजार उमेदवारांचे अर्ज

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८८ मतदारसंघातून सुमारे ७ हजार ६६६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूकीला सामारे जाण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा शनिवारी पूर्ण झाला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस असल्यामुळे सगळीकडे उमेदवारांची झुंबड उडाली होती. रात्री उशिरापर्यंत निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यभरातील आकडेवारी एकत्रित करण्याच्या कामात व्यस्त होते. नांदेड दक्षिणमधून सर्वाधिक ९१ अर्ज प्राप्त झाले असून नांदेड उत्तरमध्येही ८० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पृथ्वीराज चव्हाणांच्या कराड दक्षिणमध्ये २६ जणांनी तर अजित पवारांच्या बारामतीत २४ जणांनी अर्ज सादर केले. गुहागर, कुडाळ आणि माहिम मतदारसंघांमध्ये सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी ९ जणांनी अर्ज सादर केले.
अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून २९ तारखेला वैध अर्जांची घोषणा आयोगाकडून करण्यात येईल. तर १ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारांना आपला अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर २८८ मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होईल. राज्यभरातील तब्बल ९० हजार ४०३ मतदान केंद्रावर त्यासाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होईल. १९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी असेल. (प्रतिनिधी)

Web Title: Aab, 7,000 applicants' application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.