आधार’ नोंदणी आता सरकारी कार्यालयांतच

By admin | Published: July 3, 2017 05:11 AM2017-07-03T05:11:30+5:302017-07-03T05:24:57+5:30

आधारकार्डची नोंदणी यापुढे फक्त सरकारी किंवा नगरपालिकांच्या परिसरातील केंद्रांवरच होईल. आधार क्रमांक देणाऱ्या युआयडीएआयने

Aadhaar 'is now in government offices only | आधार’ नोंदणी आता सरकारी कार्यालयांतच

आधार’ नोंदणी आता सरकारी कार्यालयांतच

Next

‘लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आधारकार्डची नोंदणी यापुढे फक्त सरकारी किंवा नगरपालिकांच्या परिसरातील केंद्रांवरच होईल. आधार क्रमांक देणाऱ्या युआयडीएआयने राज्यांना आधारसाठी होणारी प्रत्येक नोंदणी (खासगी संस्थांकडीलदेखील) येत्या सप्टेंबरपर्यंत सरकारी किंवा नगरपालिकांच्या परिसरात स्थलांतरीत करण्यास सांगितले आहे.
देशभरात आधारसाठी नोंदणी करून घेणारी २५ हजार केंद्रे असून ती आता थेट सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली येतील. नव्या व्यवस्थेद्वारे सरकार आधारची नोंदणी आणि अद्ययावत करण्याच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवणार असल्यामुळे याच कामासाठी आकारले जाणारे अव्वाच्यासव्वा शुल्क बंद होईल.
युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात आधारसाठी नोंदणी व अद्ययावत करण्याच्या कामासाठी सरकारी कार्यालयांच्या परिसरात केंद्रे ३१ जुलैपर्यंत शोधण्यास सांगितले आहे. नव्या ठिकाणी ही केंद्रे हलवण्याचे काम ३१ येत्या आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. ही नवी केंद्रे जिल्हा परिषदा, जिल्हाधिकारी कार्यालये किंवा नगरपालिकांच्या कार्यालयात असतील, असे पांडे म्हणाले.

Web Title: Aadhaar 'is now in government offices only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.