आधार कार्ड बनवणाऱ्या १ हजार आॅपरेटर्सच्या सेवा तडकाफडकी रद्द

By admin | Published: April 9, 2017 08:37 PM2017-04-09T20:37:43+5:302017-04-09T20:37:43+5:30

युनिक आयडेंटीफिकेशन अ‍ॅथॉरीटी आॅफ इंडिया (युआयडीएआय) ने आधार कार्ड तयार करणाऱ्या १ हजार आॅपरेटर्सच्या सेवा बंद

Aadhar card cancellation of service of 1 thousand operators | आधार कार्ड बनवणाऱ्या १ हजार आॅपरेटर्सच्या सेवा तडकाफडकी रद्द

आधार कार्ड बनवणाऱ्या १ हजार आॅपरेटर्सच्या सेवा तडकाफडकी रद्द

Next

सुरेश भटेवरा / ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.9 - युनिक आयडेंटीफिकेशन अ‍ॅथॉरीटी आॅफ इंडिया (युआयडीएआय) ने आधार कार्ड तयार करणाऱ्या १ हजार आॅपरेटर्सच्या सेवा बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. इतकेच नव्हे तर या सर्वांवर १0 हजार रूपयांचा दंडही ठोठावला आहे.

आधार कार्ड तयार करण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. तरीही या आॅपरेटर्सनी अवाजवी फी आकारल्याचा आरोप आहे.
आधार कार्डबाबत सरकार आग्रही असतांना विविध ठिकाणाहून या तक्रारी प्राप्त झाल्याने युआयडीएआयने ही धडक कारवाई केली. या संदर्भात बोलतांना युआयडीएआयचे सीईओ अजयभूषण पांडे म्हणाले, आधार कार्ड बाबत कोणी कोणतीही हेराफेरी केली तर झिरो टॉलरन्स हे आमच्या विभागाचे धोरण आहे. डिसेंबर २0१६ पासून आजतागायत आम्ही १ हजार असे आॅपरेटर्स शोधून काढले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून आमच्या व्यवस्थेतून त्यांना आम्ही हद्दपार करून टाकले. देशात कोणत्याही भागात हे आॅपरेटर्स आता आधार कार्डाची नोंदणी करू शकणार नाहीत.


पूर्वीच्या आधार कार्डची माहिती अपडेट करण्यासाठी युआयडीएआयने २५ रूपये फी निश्चित केली आहे. तथापि काही आॅपरेटर्स यासाठी देखील अधिक पैसे आकारीत असल्याच्या तक्रारी युआयडीएआयकडे पोहोचल्या आहेत. ठरलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या आॅपरेटर्सना ताकीद देण्यात आली असून गंभीर स्वरूपाच्या तक्रारींबाबत एफआयआर देखील नोंदवण्यात आल्या आहेत.
 

Web Title: Aadhar card cancellation of service of 1 thousand operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.