नेपाळ, भूतानला जाताना सोबत बाळगा आधार कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 05:56 AM2019-01-21T05:56:46+5:302019-01-21T05:57:00+5:30

भारतातील १५ वर्षांखालील व ६५ वर्षांहून अधिक वयाचे नागरिक नेपाळ व भूतानला जाताना आधार कार्डचा वैध दस्तावेज म्हणून वापर करू शकतील.

With Aadhar card going to Nepal, Bhutan | नेपाळ, भूतानला जाताना सोबत बाळगा आधार कार्ड

नेपाळ, भूतानला जाताना सोबत बाळगा आधार कार्ड

Next

नवी दिल्ली : भारतातील १५ वर्षांखालील व ६५ वर्षांहून अधिक वयाचे नागरिक नेपाळ व भूतानला जाताना आधार कार्डचा वैध दस्तावेज म्हणून वापर करू शकतील. ही माहिती केंद्रीय गृह खात्याने दिली. याव्यतिरिक्तच्या वयोगटातील नागरिकांना या दोन्ही देशात जाताना आधार कार्डचा वापर करता येणार नाही. भारतीयांकडे वैध पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र किंवा रेशन कार्ड असल्यास त्यांना नेपाळ, भूतानमध्ये विनासायास प्रवेश मिळतो. त्यासाठी तेथील व्हिसा काढण्याची गरज नसते. याआधी १५ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील भारतीयांनी आपले पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, केंद्रीय आरोग्य सेवा (सीजीएचएस) हे संबंधित अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर त्यांना या देशांना भेट देता येत असे. मात्र, त्यावेळी वैध दस्तावेजांच्या यादीत आधारचा समावेश दोन्ही देशांनी केलेला नव्हता.
।काही प्रसंगी चालतात ही कागदपत्रे
भारतीय नागरिकाला काठमांडू येथील भारतीय दूतावासाने दिलेले नोंदणी प्रमाणपत्र हे नेपाळला भेट देण्याकरिता वैध दस्तावेज समजले जाणार नाहीत. मात्र, आपत्कालीन स्थितीत या दूतावासाने दिलेले प्रमाणपत्र किंवा ओळख प्रमाणपत्र नेपाळमधून भारतात परतताना चालू शकेल; पण ही मुभा एकाच वेळच्या प्रवासासाठी आहे.
शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी ठराविक नमुन्यात भरून ओळख प्रमाणपत्र सोबत असल्यास १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना नेपाळ, भूतानमध्ये प्रवेश दिला जातो.
या देशांत जाणाºया एखाद्या कुटुंबातील सर्वांनीच वैध दस्तावेज सोबत बाळगायला हवेत याची आवश्यकता नाही. त्यांच्यासोबत असलेल्या प्रमुख व्यक्तीकडे पासपोर्ट किंवा निवडणूक ओळखपत्र असेल तर त्यांची तपासणी होऊन या सर्वांना देशात प्रवेश दिला जातो.

Web Title: With Aadhar card going to Nepal, Bhutan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.