गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर 'तो' झाला IAS; अपयश आलं पण मानली नाही हार, करून दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:12 IST2025-01-28T16:12:09+5:302025-01-28T16:12:41+5:30

Aaditya Pandey : तरुणाने प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर आपलं नशीब बदलण्यासाठी आयएएस होण्याचा निर्णय घेतला.

Aaditya Pandey success story Aditya became an ias after being betrayed by his girlfriend | गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर 'तो' झाला IAS; अपयश आलं पण मानली नाही हार, करून दाखवलं

गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर 'तो' झाला IAS; अपयश आलं पण मानली नाही हार, करून दाखवलं

एका तरुणाने प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर आपलं नशीब बदलण्यासाठी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. आदित्य पांडे असं या तरुणाचं नाव असून त्याने २०२२ मध्ये ऑल इंडिया ४८ वा रँक मिळवला आहे. आदित्य हा पाटणा जिल्ह्यातील बिसुनपूर पाकरी गावचा रहिवासी आहे. आदित्य लहानपणापासूनच खोडकर होता. म्हणून, त्याच्या कुटुंबाने त्याला त्याच्या बहिणीकडे राहण्यासाठी जामनगरला पाठवले. 

आदित्यने आठवी आणि नववीपर्यंत अभ्यासात चांगली कामगिरी केली, पण दहावीत तो एका मुलीच्या प्रेमात पडला आणि या सर्व प्रकरणांमुळे त्याचा निकालावर वाईट परिणाम झाला. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी पाठवण्यात आलं. तिथेही तो प्रेमात पडला. तेव्हा तो खूप रडला. शिक्षण पूर्ण झाल्यावर एका खासगी कंपनीत काम करू लागला. पण काही दिवसांनी ती नोकरी सोडली.

आदित्यने एमबीए करण्याचा निर्णय घेतला आणि कॅट २०१५ मध्ये ९५ पर्सेंटाइल मिळवून यश मिळवलं. आदित्यला आयआयटी रुरकीमध्ये प्रवेश मिळाला आणि तिथेच तो परत प्रेमात पडला. ६ महिने प्रेमात खूप छान वाटलं, पण त्यानंतर मुलीने आदित्यला तू खूप वाईट असल्याचं सांगून सोडून दिलं. त्यानंतर रागाच्या भरात आदित्य म्हणाला की, मी यूपीएससी करेन आणि आयएएस होईन.

आदित्यने काहीही अभ्यास न करता पहिल्यांदाच UPSC २०२० ची परीक्षा दिली, ज्यामध्ये तो नापास झाला. यानंतर त्याने अभ्यास सुरू केला. त्यानंतर तो UPSC २०२१ च्या परीक्षेत बसला, पण त्यातही तो नापास झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आदित्यचे फक्त चार प्रयत्न होते, त्यापैकी दोन वाया गेले. तरीही, आदित्यने हार मानली नाही आणि तयारी सुरू केली. कठोर परिश्रमामुळे आदित्यला अखेर यूपीएससी प्री आणि मेन्स २०२२ मध्ये यश मिळालं. आदित्यपासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे. 
 

Web Title: Aaditya Pandey success story Aditya became an ias after being betrayed by his girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.