आफताबला तुरुंगात वाचण्यासाठी हवी कायद्याची पुस्तके; न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:18 AM2023-01-11T11:18:05+5:302023-01-11T11:18:18+5:30
आफताबला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर न्यायालयात हजर करण्यात आले.
नवी दिल्ली: श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने मंगळवारी हा निकाल दिला. यावेळी न्यायालयासमोर आफताबने कोठडीत वाचण्यासाठी कायद्याची काही पुस्तके मागितली आहेत.
आफताबला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी शुक्ला यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना आफताबला उबदार कपडे देण्याची सूचना केली. यापूर्वी ६ डिसेंबर रोजी न्यायालयाने पूनावालाच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ केली होती.
आफताब १२ नोव्हेंबरपासून कोठडीत आहे. १५ दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबला तिहार तुरुंगातून सेंट्रल फॉरेन्सिक लॅबमध्ये आणले होते. जिथे त्याच्या आवाजाचा नमुना घेण्यात आला आहे.