AAI Recruitment 2020 : विमानतळावर नोकरीची संधी; मिळणार 1,40,000 बंपर पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 04:20 PM2020-08-15T16:20:50+5:302020-08-15T16:34:11+5:30
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. विमानतळावर नोकरीची संधी मिळणार असून तब्बल 1,40,000 रुपये पगार मिळू शकतो.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. विमानतळावरनोकरीची संधी मिळणार असून तब्बल 1,40,000 रुपये पगार मिळू शकतो. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (Airport Authority of India, AAI) कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) पदासाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरू झाली आणि 2 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.
कनिष्ठ सहाय्यक पदासाठी एएआयच्या अधिकृत वेबसाईट www.aai.aero वर जाऊन अर्ज करता येऊ शकतो. मात्र अर्ज करत असताना काही गोष्टींकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. या पदासाठी अर्ज करताना लागणारी पात्रता, वय आणि इतर आवश्यक अशा पोस्टशी संबंधित सर्व अटी तपासल्यानंतरच अर्ज करा. कारण जर अर्जात कोणतीही गडबड झाली तर फॉर्म रिजेक्ट केला जाईल. कनिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 40,000 ते 1,40,000 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.
कनिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीई, बीटेक पदवी घेतली पाहिजे. उमेदवारांनी गेट क्वालिफाय असणंही आवश्यक आहे. तसेच अर्ज करणार्या उमेदवारांचे वय 27 वर्षे असावे. सिव्हिल 15 पोस्ट, इलेक्ट्रिकल- 15 पोस्ट, इलेक्ट्रानिक्स- 150 पोस्ट असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे काढलेल्या या पदांसाठी उमेदवाराला अर्ज करायचा असल्यास 300 रुपये फी भरावी लागणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : लय भारी! अमेरिकेसह 'या' पाच देशांना केला पीपीई किटचा पुरवठाhttps://t.co/6rVJxCqdHV#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#AtmaNirbharBharat#PPE
— Lokmat (@MiLOKMAT) August 15, 2020
CoronaVirus News : चिंता वाढवणारी आकडेवारी! कोरोनाच्या रुग्णसंख्येत भारताने ब्राझीललाही टाकले मागेhttps://t.co/PHDtfcKiWn#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) August 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या
...म्हणून महिलेने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'Sky'
CoronaVirus News : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण
Independence Day 2020 : "आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र"