व्यापाऱ्याच्या पैशाने ‘आप’ नेत्यांचे दौरे
By admin | Published: May 22, 2017 03:29 AM2017-05-22T03:29:12+5:302017-05-22T03:29:12+5:30
४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अडकलेल्या व्यावसायिकाच्या पैशाने आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी परदेश दौरे केले, असा आरोप दिल्लीचे बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अडकलेल्या व्यावसायिकाच्या पैशाने आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी परदेश दौरे केले, असा आरोप दिल्लीचे बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे.
आपचे निलंबित नेते कपिल मिश्रा यांनी रविवारी केजरीवाल यांच्यासमोर नऊ प्रश्न ठेवले आहेत. आपचे नेते संजय सिंह आणि आशुतोष यांचा रशिया दौरा त्या व्यक्तीकडून प्रायोजित होता ज्या व्यक्तीची नंबर प्लेटच्या ४०० कोटींच्या घोटाळ्यात चौकशी सुरू आहे. याची कल्पना केजरीवाल यांना होती का? असा सवाल त्यांनी केला आहे.
आपचे माजी नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची कपिल मिश्रा यांनी माफी मागितली. या नेत्यांना एप्रिल २०१५ मध्ये पक्षातून काढून टाकण्यात आले होते. कारण, त्यांनी केजरीवाल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या नेत्यांना पक्षातून काढण्यास आपण जबाबदार आहोत, असे ते म्हणाले.