संपुर्ण राज्याच्या दर्जासाठी दिल्लीतही सार्वमत - केजरीवाल

By admin | Published: June 24, 2016 02:07 PM2016-06-24T14:07:01+5:302016-06-24T14:08:54+5:30

ब्रिटनच्या सार्वमत चाचणीनंतर दिल्लीतदेखील संपुर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी लवकरच सार्वमत चाचणी घेणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं आहे

Aam Aadmi Party in Delhi even for the status of the entire state - Kejriwal | संपुर्ण राज्याच्या दर्जासाठी दिल्लीतही सार्वमत - केजरीवाल

संपुर्ण राज्याच्या दर्जासाठी दिल्लीतही सार्वमत - केजरीवाल

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 24 - ब्रिटनने सार्वमत चाचणीच्या आधारावर युरोपिय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दिल्लीला संपुर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरसावले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सार्वमत घेणार असल्याची घोषणा केली. ब्रिटनच्या सार्वमत चाचणीनंतर दिल्लीतदेखील संपुर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी लवकरच सार्वमत चाचणी घेणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं आहे. 
 
आम आदमी पक्षाने याअगोदरही दिल्लीला इतर राज्यांप्रमाणे अधिकार मिळावे आणि पोलीस तसंच प्रशासनावरील केंद्र सरकारचं नियंत्रण हटवावं ही मागणी केलेली आहे. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी अटही आम आदमी पक्षाने याअगोदर ठेवली होती. 
 

Web Title: Aam Aadmi Party in Delhi even for the status of the entire state - Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.