नोटबंदीबाबत 'आम आदमी' आमच्यासोबतच

By admin | Published: November 18, 2016 06:59 PM2016-11-18T18:59:00+5:302016-11-18T18:59:00+5:30

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आम आदमी पक्ष सरकारवर टीका करत असला तरी देशातील खरा आम आदमी निर्णयावर नाराज नाही आहे.

Aam Aadmi with us | नोटबंदीबाबत 'आम आदमी' आमच्यासोबतच

नोटबंदीबाबत 'आम आदमी' आमच्यासोबतच

Next

 ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. 18 -  पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आम आदमी पक्ष  सरकारवर टीका करत असला तरी देशातील खरा आम आदमी निर्णयावर नाराज नाही आहे. तो आमच्यासोबतच आहे, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्षाने जोरदार आघाडी उघडली आहे. या प्रश्नावरून ते दररोज सरकावर नवनवे आरोप करत आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना व्यंकय्या नायडू यांनी हा टोला लगावला. "2014 च्या निवडणुकीत भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा होता. त्यामुळे सत्ता मिळाल्यावर सरकारने त्याविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा निर्णय काही अचानक घेतलेला नाही. नोटबंदीच्या सर्जरीची देशाला आवश्यकता होती. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला," असे नायडू म्हणाले. 
यावेळी परदेशातील काळा पैसा, तसेच सरकारकडून अंबानी, अदानीसारख्या उद्योजकांना मिळत असलेल्या झुकत्या मापाबाबतही ते बोलले. "परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा हा मोदी सरकारच्या काळात ठेवण्यात आलेला नाही. तर तो त्याआधीच्या काळातील आहे. तसेच अंबानी, अदानी हे उद्योजक मोदींच्या कार्यकाळात उदयास आलेले नाहीत. तर हे उद्योजक ही याआधीच्या सरकारांची देणगी आहे." अशी माहिती त्यांनी दिली. नोटबंदीच्या निर्णयावरून विरोधी पक्ष राजकारण तापवत असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यामुळे नायडू यांनी समाधान व्यक्त केले. 

Web Title: Aam Aadmi with us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.