AAP: 'आप' नवा खेळ खेळणार, भज्जीसह राघव चड्ढा, IIT प्रोफेसरही राज्यसभेत जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 06:59 PM2022-03-18T18:59:59+5:302022-03-18T19:01:34+5:30

एकीकडे नवज्योत सिंग सिद्धूंचा दारुण पराभवामुळे पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्ष एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणत आहे

AAP: 'Aap' will play a new game, Raghav Chadha will also go to Rajya Sabha with Bhajji? | AAP: 'आप' नवा खेळ खेळणार, भज्जीसह राघव चड्ढा, IIT प्रोफेसरही राज्यसभेत जाणार?

AAP: 'आप' नवा खेळ खेळणार, भज्जीसह राघव चड्ढा, IIT प्रोफेसरही राज्यसभेत जाणार?

Next

चंडीगड - नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पंजाबमध्ये आलेल्या आपच्या लाटेत सत्ताधारी काँग्रेससह, अकाली आणि भाजपा हे पक्षही झाडून साफ झाले होते. त्यानंतर आपचे नेते भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आम आदमी पक्ष अजून एक मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. माजी क्रिकेटर हरभजनसिंग आणि आयआयटी प्रोफेसर राघव चड्ढा यांनाही राज्यसभेवर पाठवणार आहे.   

एकीकडे नवज्योत सिंग सिद्धूंचा दारुण पराभवामुळे पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्ष एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणत आहे. त्या जोडीलाच दिल्ली आयआयटीचे असोसिएट प्रोफेसर संदीप पाठक आणि युवा नेते राघव चड्ढा यांनाही राज्यसभेवर पाठविण्याची तयारी सुरू आहे. राघव चड्ढाने पंजाब निवडणुकांमध्ये आपचे सहप्रभारी म्हणून काम पाहिले होते, तर संदीप पाठक यांनी पडद्यामागे पाहून आम आदमी पक्षाच्या निवडणुकीत मोलाची भूमिका बजावली आहे.

राघव चड्ढा यांना पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. पंजाबमधील काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार चरणजीतसिंग चन्नी यांना पूर्णपणे घेरण्यात ते यशस्वी झाले. तसेच, आपचे कॅम्पेनही यशस्वीपणे रावघ चड्ढा यांनी राबवले. अवैध वाळू उपसा हा मुद्दा घेऊन चड्ढा यांनी चन्नींना चांगलंच फैलावर घेतलं होतं. सध्या चड्ढा हे दिल्लीतून आमदार आहेत. 

हरभजनला स्पोर्ट युनिव्हर्सिटीचं नेतृत्व

मिळत असलेल्या माहितीनुसार आम आदमी पक्ष भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या राजकीय प्रवेशासाठी पायघड्या पसरत आहे. आम आदमी पक्षाने हरभजनला राज्यसभेवर पाठवण्यासाठी तयारी केल्याचे वृत्त आहे. तसेच त्याला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे नेतृत्वही देण्याची शक्यता आहे.
 

Web Title: AAP: 'Aap' will play a new game, Raghav Chadha will also go to Rajya Sabha with Bhajji?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.