Arvind Kejriwal : "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 04:04 PM2024-11-11T16:04:19+5:302024-11-11T16:05:10+5:30

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

AAP Arvind Kejriwal got angry at bjp over increasing crime in delhi | Arvind Kejriwal : "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

Arvind Kejriwal : "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीच्या रोहिणी भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाकडून रविवारी खंडणीची मागणी करण्यात आली. भाजपा दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नाही, मग जनता त्यांना संपूर्ण दिल्लीची जबाबदारी कशी देऊ शकते? असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. 

दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत मनीष सिसोदिया यांनी सांगितलं की, "रविवारी पहाटे पुन्हा एकदा दिल्लीत एका व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. एकही दिवस जात नाही जेव्हा दिल्लीच्या विविध भागातून गोळीबार किंवा खंडणीची मागणी होत नाही. गँगस्टरचं नेटवर्क वाचवण्याच्या नादात भाजपाने दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली आहे. इतकी वाईट अवस्था आम्ही आजवर पाहिलेली नाही." 

"अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली १० दिवसांत कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात येईल. दिल्लीत दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी कोणत्या ना कोणत्या भागातून लोक खुलेआम पिस्तूल फिरवत असल्याच्या घटना आणि व्हिडिओ समोर येत आहेत. व्यापाऱ्यांना धमकावलं जात आहे. रविवारी सराफा व्यापाऱ्याकडून खंडणी उकळल्याची घटना समोर आली आहे. ९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्ड ज्या स्थितीत राज्य करत असे, ती स्थिती भाजपाने दिल्लीत आणल्याचं दिसतं."

"आज दिल्लीत गुंडाराज आहे. कोणताही व्यापारी किंवा सामान्य माणूस सुरक्षित वाटत नाही. ज्याचा व्यवसाय चांगला चालतो त्याला गुंडाचा फोन येईल की काय अशी भीती वाटू लागते. भाजपाने दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था एवढी बिघडवली आहे की, देशाची राजधानी असूनही दिल्लीच्या कानाकोपऱ्यात दररोज गोळीबार आणि खंडणीच्या घटना समोर येत आहेत" असंही म्हटलं आहे. 
 

Web Title: AAP Arvind Kejriwal got angry at bjp over increasing crime in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.