Arvind Kejriwal : "भाजपाचे नेते, कार्यकर्ते मला गुपचूप भेटतात आणि म्हणतात..."; अरविंद केजरीवालांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 10:15 AM2022-10-10T10:15:21+5:302022-10-10T10:23:02+5:30

AAP Arvind Kejriwal And BJP : "काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तो पक्ष सोडून आम आदमी पार्टीमध्ये सामील होऊ शकता" असं देखील केजरीवालांनी म्हटलं आहे.

AAP Arvind Kejriwal said bjp leaders meet me secretly on gujarat visit | Arvind Kejriwal : "भाजपाचे नेते, कार्यकर्ते मला गुपचूप भेटतात आणि म्हणतात..."; अरविंद केजरीवालांचा मोठा गौप्यस्फोट

Arvind Kejriwal : "भाजपाचे नेते, कार्यकर्ते मला गुपचूप भेटतात आणि म्हणतात..."; अरविंद केजरीवालांचा मोठा गौप्यस्फोट

googlenewsNext

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (AAP Arvind Kejriwal) यांनी भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांबाबत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "गुजरातमधील भाजपा कार्यकर्ते छुप्या पद्धतीने आम आदमी पक्षाला समर्थन देत आहेत. नेते गुपचूप येऊन मला भेटतात. आगामी निवडणुकीत त्यांना स्वपक्षाचाच पराभव पाहायचा आहे" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. गुजरातच्या अनेक शहरांमध्ये लावण्यात आलेल्या पोस्टरवरून त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोस्टरच्या मागे जे लोक आहेत ते राक्षस आणि कंस यांचे वंशज असल्याची बोचरी टीका केली आहे. 

"भाजपाचे अनेक नेते, कार्यकर्ते मला येऊन भेटतात आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी छुप्या पद्धतीने सांगतात. ज्या भाजपा कार्यकर्त्यांना स्वपक्षाचा पराभव करायचा आहे, त्यांनी आपसाठी काम करावे" असे आवाहन गुजरातच्या वलसाडमधील एका सभेत केजरीवाल यांनी केले आहे. तसेच "भाजपाचा अहंकार आपल्याला मोडायचा आहे. तुम्हाला तुमचे व्यवसाय आहेत. तुम्ही आमच्या पक्षात आल्यास तुमच्या व्यवसायाचे नुकसान केले जाईल. त्यामुळे तुम्ही त्याच पक्षात राहून त्यांच्या पराभवासाठी गोपनीयरित्या काम करा."

"राक्षसांचा अंत करण्यासाठी पाठिंबा द्या"

"काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तो पक्ष सोडून आम आदमी पार्टीमध्ये सामील होऊ शकता" असं देखील केजरीवालांनी म्हटलं आहे. राक्षसांचा अंत करण्यासाठी पाठिंबा द्या, असे आवाहन वलसाडमधील सभेत केले आहे. सर्वांनी नव्या गुजरातसाठी एकत्र आलं पाहिजे. पक्षाची चिंता करू नका. देशासाठी, राज्यासाठी काम करा, असे अरविंद केजरीवाल या सभेत म्हणाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे, 

"भाजपा पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवतंय; आमदारांना 25 कोटींची ऑफर"

पंजाबमधील आम आदमी पार्टी (AAP) सरकारचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा (Harpal Singh Cheema)  काही दिवसांपूर्वी भाजपावर गंभीर आरोप केला होता. पंजाबमध्येभाजपाने ऑपरेशन लोटस चालवले असून भाजपा आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरपाल सिंग चीमा म्हणाले होते. अर्थमंत्री चीमा यांनी भाजपा प्रत्येक AAP आमदाराला प्रत्येकी 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे असं म्हटलं होतं. "सीरियल किलर भाजपाने आता पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस आणले आहे. पंजाबमधील 'आप'च्या आमदारांना 25-25 कोटींची ऑफर दिली आहे. पण भाजपा हे विसरत आहे की आम आदमी पक्षाचा एकही आमदार विक्रीसाठी नाही. दिल्लीप्रमाणे पंजाबमध्येही भाजपाची कारवाई अपयशी ठरेल" असं ट्विटमध्ये म्हटलं होतं.
 

Web Title: AAP Arvind Kejriwal said bjp leaders meet me secretly on gujarat visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.