केजरीवालांनी सांगितला चीनला धडा शिकवण्याचा 'मास्टर प्लान'; म्हणाले...गॅरंटी देतो की...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 06:55 PM2022-12-18T18:55:48+5:302022-12-18T18:56:58+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी चीनहून केल्या जाणाऱ्या आयातीच्या मुद्द्यावरुन भाजपाला घेरलं आहे.

aap arvind kejriwal told master plan to break china economic back says i guarantee export will start | केजरीवालांनी सांगितला चीनला धडा शिकवण्याचा 'मास्टर प्लान'; म्हणाले...गॅरंटी देतो की...

केजरीवालांनी सांगितला चीनला धडा शिकवण्याचा 'मास्टर प्लान'; म्हणाले...गॅरंटी देतो की...

Next

नवी दिल्ली-

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी चीनहून केल्या जाणाऱ्या आयातीच्या मुद्द्यावरुन भाजपाला घेरलं आहे. त्यांनी देशातील लोकांना चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. केजरीवाल म्हणाले की चीनच्या आयातीचा मुद्दा देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाला वेदना देणारा आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन आपल्याकडे डोळे वटारुन पाहात आहे. आता छोटे छोटे वार करुन काही उपयोग नाही असं सांगत केजरीवाल यांनी यावेळी चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा मास्टर प्लान सांगितला. 

"भारतीय जवान चीनच्या आगळीकीला जशास तसं उत्तर देत आहेत. काही जवानांनी तर आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मग हेही ऐकू येतं की चीन भारतीय सीमेत काही किलोमीटर आत शिरला आहे. भारत सरकार म्हणतं सारंकाही ठिक आहे. मग मीडियात बातम्या येतात की सीमेवर सारंकाही आलबेल नाही. एका बाजूला चीन मोठ्या हिमतीनं चीनी सैनिकांचा मुकाबला करत आहे", असं केजरीवाल म्हणाले. 

भाजपावर केला हल्लाबोल
"केंद्र सरकार आणि भाजपावाले चीनला उत्तर देण्याऐवजी चीनला डोळ्यात डोळे घालून उत्तर देण्याऐवजी बक्षिसांचा वर्षाव होत आहे. भारतानं चीनकडून ६५ बिलियन डॉलरचं सामान खरेदी केलं आहे. केंद्राचा असा कोणता नाईलाज झाला आहे की चीनला इतका मोठा व्यवसाय दिला जात आहे. चीनहून चप्पल, खेळणी आणि कपडे आयात केले जातात. हे सामान तर भारतातही तयार केलं जाऊ शकतं", असं केजरीवाल म्हणाले. 

९० टक्के वस्तूंचं भारतातच उत्पादन करता येईल
केजरीवाल म्हणाले, भारतीय जनता पक्षाला माझं आवाहन आहे की असं स्वत: गहाण टाकण्याचं काम करू नका. चीनसमोर झुकू नका. ज्या दिवशी आपण चीनच्या वस्तू बॉयकॉट करणं सुरू करू तेव्हाच चीनला त्यांची औकात लक्षात येईल. चीनहून आयात केल्या जाणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक वस्तू भारतातही उत्पादित केल्या जाऊ शकतात. भारताची परिस्थिती सध्या इतकी वाईट करुन ठेवलीय की मोठ-मोठे उद्योगपती देश सोडून जात आहेत"

गेल्या पाच ते सात वर्षात १२.३० लाख लोक भारत सोडून गेले आहेत. इथं कुणालाच काम करू दिलं जात नाही. मोठ-मोठे व्यापारी देश सोडून जात आहेत. खोट्या केसेस दाखल करुन सर्वांना ठेच पोहोचवली जात आहे. चोरांना आपल्या पक्षात सामील करुन घेतलं जातं आणि जे इमानदारीनं काम करु इच्छित आहेत ते मागे पडत आहेत, असंही केजरीवाल म्हणाले. 

चीनचा स्वस्त माल नको
"चीनला आपल्या सैनिकांच्या जीवाची अजिबात किंमत नाही. चीन स्वस्त माल देतो असं सांगितलं जातं. पण आपल्याला स्वस्त माल नको. आम्ही भारताचा माल खरेदी करू मग तो कितीही बनू देत", असं केजरीवाल म्हणाले. त्यांनी यावेळी मेक इन इंडियावर जोर दिला आणि भारतातील जनतेला कट्टर देशभक्त देखील म्हटलं. "भारतातील लोक कट्टर देशभक्त आहेत. आम्हाला चीनचा स्वस्त माल नको. आम्ही भारतात तयार झालेलाच माल खेरदी करू मग तो चीनच्या तुलनेत दुप्पट किमतीला का असेना. पण चीनहून माल आयात करणं थांबवा. देशातील जनतेलाही मला आवाहन करायचं आहे की चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाका", असंही केजरीवाल म्हणाले. 

Web Title: aap arvind kejriwal told master plan to break china economic back says i guarantee export will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.