भाजपाची हिंदू-मुस्लिम राजकारण करण्याची हिंमत नाही - केजरीवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 09:50 AM2019-10-23T09:50:50+5:302019-10-23T09:55:43+5:30

दिल्लीतील सदर बाजारमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

AAP changed narrative BJP doesn't have courage to do Hindu-Muslim politics in Delhi Kejriwal | भाजपाची हिंदू-मुस्लिम राजकारण करण्याची हिंमत नाही - केजरीवाल 

भाजपाची हिंदू-मुस्लिम राजकारण करण्याची हिंमत नाही - केजरीवाल 

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. दिल्लीत भाजपामध्ये हिंदू-मुस्लिम राजकारण करण्याची हिंमत नाही आहे, कारण आम आदमी पार्टीने आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे राजकीय चर्चेची दिशा बदलली आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तसेच, आपल्या सरकारद्वारे करण्यात आलेल्या कामांचे कौतुक करत, पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आम आदमी पार्टीला मतदान करतील, असाही दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्लीतील सदर बाजारमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले, " भाजपाजवळ दिल्लीत हिंदू-मुस्लिम राजकारण करण्याची हिंमत नाही आहे, कारण आम्ही देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून आरोग्य आणि शिक्षण याकडे लक्ष दिले आहे. आम्ही भाजपाला आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यास मजबूर केले आहे. ही मोठी बाब आहे." याचबरोबर, दिल्लीतील प्रत्येक नागरिकाला दिल्ली सरकारकडून लागू करण्यात आलेल्या योजनांचा लाभ मिळत असल्याचेही यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

दरम्यान, दिल्ली सरकारने आपल्या हद्दीतील सर्वच रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक रस्त्याचे आज रिडिझायनिंग सुरू करण्यात आले आहे. त्यातील नऊ रस्त्यांचा पहिला पायलट प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.  यावेळी ते म्हणाले, "दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत एकूण 1260 किमीचे रस्ते येत आहेत. या सर्व रस्त्यांची फेर आखणी केली जात आहे. त्याद्वारे वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नावरही उकल साधली जाईल. पायलट प्रकल्पात 45 किमी अंतराचे जे नऊ रस्ते नव्याने आखले जाणार आहेत, त्याचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल. कामासाठी चारशे कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. तसेच, फुटपाथही मोठे केले जाणार असून या रस्त्यांवर अपंगांसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे."
 

Web Title: AAP changed narrative BJP doesn't have courage to do Hindu-Muslim politics in Delhi Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.