‘आप’ने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला!

By admin | Published: January 31, 2015 11:53 PM2015-01-31T23:53:01+5:302015-01-31T23:53:01+5:30

आम आदमी पार्टीने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला पुन्हा सत्तेवर बसविण्याची घोडचूक करू नये,

AAP has dumped the dancers behind the people! | ‘आप’ने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला!

‘आप’ने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला!

Next

मोदींची टीका : दिल्ली विधानसभेचा प्रचार शिगेला, आपचाही भाजपवर हल्लाबोल
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला पुन्हा सत्तेवर बसविण्याची घोडचूक करू नये, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘आप’वर हल्लाबोल केला.
येथे एका निवडणूक प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले, एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी स्वप्न दाखविले होते, त्याच लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमची स्वप्ने धुळीस मिळविली. दिल्लीकरांनी लोकसभा निवडणुकीत दिल्लीला उद्ध्वस्त करणाऱ्यांना क्षमा केली नाही. आता विधानसभा निवडणुकीतही दिल्लीची वाट लावणाऱ्यांना दिल्लीची जनता पसंत करणार नाही.
‘आप’ किंवा त्या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा नामोल्लेख न करता मोदी पुढे म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाच्या सर्वाधिक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली, त्या पक्षाला तुम्ही चांगल्याप्रकारे ओळखून आहात. असे असतानाही तो पक्ष आता लोकांना संभ्रमित करण्याची कोणतीही कसर बाकी ठेवताना दिसत नाही.
एखादवेळी खोटे बोलले तर चालते; परंतु नेहमी-नेहमी लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून यश प्राप्त करता येत नाही.किरण बेदी यांच्या नेतृत्वात भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देण्याचे आवाहन मोदी यांनी केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)


करून मोदी म्हणाले, दिल्लीतील वर्षभराचे ‘बुरे दिन’ आता संपलेले आहेत. काही लोकांनी गेले एक वर्ष वाया घालविण्याचेच काम केले. स्पष्ट बहुमताचे सरकार द्या. दिल्लीदेखील विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याशिवाय राहणार नाही.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

४दिल्लीतील प्रत्येक घटनेचा संपूर्ण भारतावर प्रभाव पडत असतो. साऱ्या जगात आम्ही दिल्लीला कोणत्या रूपात सादर करतो, हे लक्षात घेऊन या निवडणुकीकडे पाहिले पाहिजे. मी दिल्लीला समस्यामुक्त करण्यासाठी आलो आहे. मला केवळ साऊथ ब्लॉकमध्येच बसू देऊ नका. दिल्लीच्या गल्लीबोळातही काम करण्याची संधी द्या, असे मोदी यावेळी म्हणाले.

भाजपच्या प्रश्नपंचकाकडे आपने फिरविली पाठ
भाजपने आम आदमी पार्टीला दररोज पाच प्रश्न विचारण्याचा सपाटा लावला असतानाच, आम्ही या प्रश्नांची उत्तरे देणार नाही, असे आपने स्पष्ट केले आहे़ भाजप आम्हाला जाहीर व्यासपीठावरून प्रश्न विचारू शकत होती; पण आम्ही दिलेल्या जाहीर खुल्या चर्चेचे आव्हान नाकारून त्यांनी पळ काढला आहे, अशी बोचरी टीका आप नेते आशुतोष यांनी शनिवारी केली़
पाच हजारांवर मद्याच्या बाटल्या जप्त
आपचे उत्तमनगरचे उमेदवार नरेश बलियान यांच्या कथित मालकीच्या गोदामातून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री ५ हजार ९६४ मद्याच्या बाटल्या जप्त केल्या़ आयोगाच्या अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली़ शुक्रवारी रात्री उशिरा आयोगाचे भरारी पथक आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवीत ही कारवाई केली़



गोदामातून हरियाणा निर्मिती मद्याच्या ५ हजार ९६४ बाटल्या म्हणजे सुमारे ४,४७३ लिटर मद्य यावेळी जप्त करण्यात आले़ प्राथमिक चौकशीअंती, उत्तमनगर भागातील हे गोदाम आम आदमी पार्टीचे उमेदवार नरेश बलियान यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आलेले आहे; मात्र या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही़ यासंदर्भात उत्तमनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे़

बेदींची कुमार विश्वास यांच्या विरोधात तक्रार
भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या दिल्लीतील उमेदवार किरण बेदी यांनी आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधात असभ्य वक्तव्य केल्याचा आरोप लावत, पोलिसांत तक्रार दाखल केली आहे़ भाजपनेही या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे़

...तर राजकारण सोडेन- कुमार विश्वास
मी कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही़ भाजपची ‘आॅनलाईन’ वाहिनी अशा प्रकारच्या अफवा पसरवीत आहे़ मी बेदी आणि भाजपला आव्हान देतो, आरोप सिद्ध करून दाखवावेत़ आरोप सिद्ध केल्यास मी राजकारण सोडेन, अन्यथा बेदींनी सोडावे, असे कुमार विश्वास म्हणाले़

 

Web Title: AAP has dumped the dancers behind the people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.