AAP in Punjab: भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांची गळाभेट, चेहऱ्यावर दिसला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 04:34 PM2022-03-11T16:34:34+5:302022-03-11T16:34:39+5:30
AAP in Punjab:पंजाबचे भावी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपचे राष्ट्रीय संजोयक अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेतली.
नवी दिल्ली: काल म्हणजेच 10 मार्च रोजी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. या पाचपैकी चार राज्यात भाजपची सत्ता आली, तर पंजाबमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्ष (AAP) सत्तेत आला. दरम्यान, कालच्या निकालानंतर आता आज आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Maan) यांनी दिल्लीत आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची भेट घेतली.
#WATCH | Aam Aadmi Party CM candidate for Punjab Bhagwant Mann meets party convener Arvind Kejriwal and party leader Manish Sisodia, in Delhi pic.twitter.com/4WbTsMqPfM
— ANI (@ANI) March 11, 2022
एएनआय या वृत्तसंस्थेने या नेत्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. व्हिडिओमध्ये भगवंत मान सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांच्या पाया पडतात आणि नंतर दोन्ही नेते एकमेकांना घट्ट मिठी मारुन आनंद व्यक्त करताना दिसतात. केजरीवालांनातर मान मनीष सिसोदिया यांचेही आशीर्वाद घेऊन त्यांना मिठी मारतात. या भेटीदरम्यान सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता.
'आप'ची राष्ट्रीय राजकारणात मोठी छाप
काल निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मुख्यालयात जनतेची आभार मानले. तसेच, राष्ट्रीय राजकारणात येण्याचे संकेतही दिले. दिल्लीतून सुरू झालेला इन्कलाब हा आता पंजाबमध्ये पोहोचला आहे. आता हा इन्कलाब देशभरात पोहोचेल, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे.
'सर्वांनी आपमध्ये प्रवेश करावा'
पंजाबच्या लोकांनी कमाल केली, लव्ह यू पंजाब. पंजाबमध्ये जे निकाल लागले आहेत, तो एक मोठा इन्कलाब आहे. पंजाबमध्ये मोठमोठ्या खुर्च्या हलल्या आहेत. बादल, कॅप्टन, चन्नी, सिद्धू असे दिग्गज पराभूत झाले, ही मोठी क्रांती आहे. आधी दिल्लीत इन्कलाब झाला, आता पंजाबमध्ये इन्कलाब झाला. हा इन्कलाब देशभरात पसरेल. सर्व महिला, तरुण, शेतकरी, मजूर, उद्योगपती यांन आता आम आदमी पक्षात प्रवेश करावा. सर्वांनी आपली ताकद ओळखा, आता देशभरात इन्कलाब आणायचा आहे, असे आवाहन केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आपचा मोठा विजय
AAP ने पंजाब विधानसभा निवडणुकीत 92 जागांवर विजय मिळवून 117 सदस्यांच्या विधानसभेत तीन चतुर्थांश बहुमतासह राज्यात आपले सरकार स्थापन केले. काँग्रेसला 18 जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्षाला दोन जागा मिळाल्या. शिरोमणी अकाली दलाला (एसएडी) तीन जागा मिळाल्या, तर बहुजन समाज पक्षाला केवळ एक जागा जिंकता आली.