Arvind Kejriwal: "सुधरा नाहीतर...!", अरविंद केजरीवालांनी पाकिस्तानला थेट जागाच दाखवली; काश्मीरबाबत केलं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 04:05 PM2022-06-05T16:05:24+5:302022-06-05T16:05:39+5:30

AAP Jan Akrosh Rally in Delhi: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून होणाऱ्या 'टार्गेट किलिंग' प्रकरणाच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन दिल्लीत केलं होतं.

aap jan akrosh rally arvind kejriwal on jammu kashmir target killing kashmiri pandit | Arvind Kejriwal: "सुधरा नाहीतर...!", अरविंद केजरीवालांनी पाकिस्तानला थेट जागाच दाखवली; काश्मीरबाबत केलं मोठं विधान!

Arvind Kejriwal: "सुधरा नाहीतर...!", अरविंद केजरीवालांनी पाकिस्तानला थेट जागाच दाखवली; काश्मीरबाबत केलं मोठं विधान!

Next

AAP Jan Akrosh Rally in Delhi: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून होणाऱ्या 'टार्गेट किलिंग' प्रकरणाच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन दिल्लीत केलं होतं. या रॅलीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार तसंच पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. "गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीरमध्ये एकूण १८ नागरिकांची हत्या झाली आहे. ज्या लोकांना पोलीस सुरक्षा देण्यात आली होती अशाही लोकांना ठार मारण्यात आलं. काश्मीर दहशतीच्या आगीत जळत आहे, तर भाजपा राजकारणात व्यग्र आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा पूर्णपणे फोल ठरली आहे", असं केजरीवाल म्हणाले. 

काश्मीरी पंडितांना आवश्यक सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी केजरीवालांनी मोदी सरकारकडे केली आहे. गेल्या काही आठवठ्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मीरी पंडितांना लक्ष्य केलं जात आहे. यावरुन विविध राजकीय पक्षांनी भाजपावर निशाणा साधला आहे. घडलेल्या घटनांना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे. 

"जेव्हा भाजपा सत्तेत आली तेव्हा काश्मीर दहशतवादाच्या आगीत जळू लागला. भाजपाला फक्त घाणेरडं राजकारण करता येतं. यांना भारतीयांशी कोणतंही घेणं देणं नाही. संपूर्ण देशात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ४५०० काश्मीरी पंडितांचं पीएम रिलीफ फंडच्या माध्यमातून पूनर्वसन करण्यात आलं. तुम्ही त्यांना आज इतर कोणत्या राज्यात जाण्यापासून रोखलं आहे. १७७ काश्मीरींना यांनीच जम्मू-काश्मीरमध्ये ठेवलं आहे आणि त्यांची बदली केली नाही. ज्याचे परिणाम आज सर्वांसमोर आहेत", असं केजरीवाल म्हणाले. 

पाकिस्तानला दाखवली जागा
जन आक्रोश रॅलीच्या व्यासपीठावरुन केजरीवाल यांनी थेट पाकिस्तानला आव्हान दिलं. पाकिस्तानला आव्हान देताना केजरीवाल म्हणाले की,"सुधरा, नाहीतर भारतानं जर ठरवलं तर पाकिस्तान वाचणार नाही. काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि कायम राहणार आहे. या विषयावर लवकरच गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही भेट घेऊन बोलणार आहे", असं केजरीवाल म्हणाले. 

Web Title: aap jan akrosh rally arvind kejriwal on jammu kashmir target killing kashmiri pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.