तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 05:02 PM2024-04-29T17:02:18+5:302024-04-29T17:02:47+5:30

AAP Arvind Kejriwal : आतिशी यांनी सोमवारी तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

AAP leader atishi meets Delhi CM Arvind Kejriwal in tihar jail | तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

आपच्या नेत्या आतिशी यांनी सोमवारी तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यानंतर दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी म्हटलं की, "मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं आहे की, उन्हाळ्यात दिल्लीत पाण्याची कमतरता भासू नये. प्रत्येकाला औषधं मिळत राहिली पाहिजेत. लवकरच 1000 रुपये प्रति महिना दिले जातील."

आतिशी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे. "जेलमध्ये असतानाही अरविंद केजरीवाल यांना स्वतःची नाही तर 2 कोटी दिल्लीकरांची चिंता आहे. आज जेलमध्ये भेटीदरम्यान त्यांनी दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची माहिती घेतली आणि उन्हाळ्यात दिल्लीत पाण्याची कमतरता भासू नये यासाठी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या."

"मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील त्यांच्या माता, बहिणी आणि मुलींसाठीही मेसेज पाठवला आहे की, ते लवकरच बाहेर येतील आणि दिल्लीतील महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याचे वचन निश्चितपणे पूर्ण करतील" असं म्हटलं आहे. आतिशी यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात दिल्लीतील महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने अटक केली होती. मुख्यमंत्री सात मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. मंगळवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे अरविंद केजरीवाल यांची जेलमध्ये भेट घेणार आहेत. जेलमध्ये ही त्यांची दुसरी भेट असेल.
 

Web Title: AAP leader atishi meets Delhi CM Arvind Kejriwal in tihar jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.