Manish Sisodia : "माझा आणि केजरीवालांचा काय दोष होता?"; सिसोदियांनी जेलमधून आल्यावर मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 08:28 AM2024-08-22T08:28:07+5:302024-08-22T08:34:17+5:30
AAP Manish Sisodia And Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी सुलतानपूर माजरा येथे पदयात्रा केली. पदयात्रेत त्यांनी लोकांना विचारले की, "माझा काय दोष होता की या लोकांनी मला दीड वर्ष तुरुंगात ठेवलं."
आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी बुधवारी सुलतानपूर माजरा येथे पदयात्रा केली. या पदयात्रेत त्यांनी लोकांना विचारले की, "माझा काय दोष होता की या लोकांनी मला दीड वर्ष तुरुंगात ठेवलं. मी शाळाच तर बांधत होतो."
"मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी यांचा काय दोष होता, ते विजेचं बिल शून्य करत होते. जर केजरीवाल यांना भ्रष्टाचार करायचा असता, तर त्यांनी वीज बिल शून्य का केलं असतं? वीज महाग करून चोरी केली असती ना..."
"दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम असल्याने केजरीवालजी लवकरच बाहेर येतील. ते जेलमध्ये गेल्यानंतर ज्या काही अडचणी, समस्या येत असतील त्या भाजपाशी लढून दूर करतील" असं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.
📍 सुल्तानपुर माजरा
— AAP (@AamAadmiParty) August 21, 2024
मेरा क्या क़सूर था जो इन्होंने मुझे डेढ़ साल जेल में रखा, मैं स्कूल ही तो बनवा रहा था
केजरीवाल जी का क्या क़सूर था, वो बिजली के Bill जीरो ही तो कर रहे थे।
केजरीवाल जी को भ्रष्टाचार करना होता तो बिजली के बिल जीरो क्यों करते? बिजली महँगी करके चोरी ना कर लेते।… pic.twitter.com/PZniuqgVAH
"जनतेचं काम बंद पाडण्यासाठी केजरीवालांना जेलमध्ये टाकलं"
"आम्ही वीज बिल शून्यावर जाऊ देणार नाही, शाळा आम्ही बांधू देणार नाही. आम्ही हॉस्पिटल-मोहल्ला क्लिनिक बांधू देणार नाही असं भाजपावाले म्हणायचे. पण तुमचे पुत्र अरविंद केजरीवाल यांनी भाजपाशी लढून हे सर्व साध्य केलं. हे सर्व काम भाजपा करू शकत नाही, म्हणूनच त्यांनी दिल्लीतील जनतेचं काम बंद पाडण्यासाठी केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं"
"भाजपा हे सर्व करू शकत नाही"
"भाजपाने तुमचे आवडते अरविंद केजरीवालजी, संजय सिंहजी, सत्येंद्र जैनजी आणि मला जेलमध्ये टाकलं आहे कारण केजरीवाल यांनी शाळा आणि रुग्णालयं दुरुस्त केली आहेत, वीज बिल शून्य केलं आहे आणि महिलांसाठी बस प्रवास मोफत केला आहे. या सर्व गोष्टी कशा करायच्या हे भाजपाला कळत नाही, त्यांना फक्त काम थांबवून भांडण कसं करायचं हे माहीत आहे" असं देखील मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.