'पंजाबमध्येही 'आप'चा पराभव होऊ शकतो, तसे झाले तर..."; योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:56 IST2025-02-13T13:56:29+5:302025-02-13T13:56:54+5:30
आप पक्षाला दिल्लीत मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले. या पराभवानंतर आता पक्षात मोठी फूट होऊ शकते असं बोलले जात आहे.

'पंजाबमध्येही 'आप'चा पराभव होऊ शकतो, तसे झाले तर..."; योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली शंका
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'चा मोठा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला. दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्षात फूट पडू शकते अशा चर्चा सुरू आहेत. दशकभरापूर्वी भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून जन्मलेल्या या पक्षाला त्यांच्या सर्वात मोठ्या बालेकिल्ल्यात फक्त २२ जागा मिळाल्या आहेत आणि त्यांचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व मोठे चेहरे त्यांच्या जागा वाचवू शकले नाहीत.
दिल्लीतील या पराभवानंतर, पंजाबमध्ये पक्ष फुटण्याचा धोका असल्याची चर्चा सुरू झाली आणि भविष्याबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले योगेंद्र यादव यांनीही ही शंका व्यक्त केली आहे.
राज्यसभेत गदारोळात वक्फवरील जेपीसी अहवाल सादर; खरगे म्हणाले, 'आम्ही असा बनावट अहवाल स्वीकारणार नाही'
एका मुलाखतीदरम्यान योगेंद्र यादव यांनी ही शंका व्यक्त केली आहे. योगेंद्र यादव यांनी पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचा पराभव होण्याची शक्यता व्यक्त केली आणि म्हटले की जर असे झाले तर पक्ष कुठे आणि कसा टिकेल हा एक मोठा प्रश्न आहे. २०१५ मध्ये आम आदमी पक्षातून काढून टाकण्यात आलेले योगेंद्र यादव यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाबद्दल त्यांना असलेल्या शंकांची कारणे देखील सांगितली आहेत.
योगेंद्र यादव म्हणाले, 'ही एक आव्हानात्मक वेळ आहे, यात काही शंका नाही. ज्या पक्षाला ४० टक्क्यांहून अधिक मते आणि २२ आमदार आहेत तो पक्ष स्वतःच कोसळलेला पक्ष नाही. १० वर्षे राज्य केल्यानंतर एकदा निवडणूक हरणे ही तुमच्या पक्षाला तोडणारी गोष्ट नाही. पण आम आदमी पक्ष ज्या प्रकारचा आहे, तो निवडणुकांवर कसा अवलंबून आहे, अरविंद केजरीवालांवर कसा अवलंबून आहे, तो कोणत्या ताकदीने स्पर्धा करत आहे आणि भाजप कोणत्या प्रकारचे काम करेल, यावरून आम आदमी पक्षाच्या भविष्याबद्दल माझ्या मनात प्रश्नचिन्ह आहे, असंही यादव म्हणाले.
पंजाबमध्येही पराभव होऊ शकतो
योगेंद्र यादव म्हणाले, 'गुजरातमध्ये कोणताही मार्ग नाही, हरयाणामध्ये काहीही झालेले नाही. आता ते पंजाबवर अवलंबून आहे आणि जर आम आदमी पक्ष पंजाबमध्ये हरेल, याची शक्यता आहे. मी भाकीत करत नाही, पण ते हरू शकतात, यात काही शंका नाही. जर पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचा पराभव झाला तर तो कसा आणि कुठे टिकेल हा एक मोठा प्रश्न आहे, असंही यादव म्हणाले.
"जर आम आदमी पक्ष दिल्लीत जिंकला असता, तर त्यांनी इंडिया आघाडी तोडून तिसरी आघाडी स्थापन केली असती का? यावर ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्यात इंडिया अलायन्स तोडण्याची क्षमता नाही, पण त्यांच्या उपस्थितीमुळे इंडिया अलायन्समध्ये खूप तणाव निर्माण झाला होता. हे देखील खरे आहे की इंडिया अलायन्सची सुरुवात झाल्यापासून केजरीवाल यांचा पक्ष त्यात होते आणि नव्हतेही. ते यायचे पण बोलतही नव्हते. पण ते पंजाबमध्ये वेगळे लढले. योगेंद्र यादव यांनी अरविंद केजरीवाल यांच्या इंडिया आघाडी आणि यमुनेतील विषाबाबतच्या विधानाचा निषेध केला.