...अन्यथा दिल्लीच्या रस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसतील; आप आमदाराची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 09:37 AM2021-04-30T09:37:52+5:302021-04-30T09:43:43+5:30
Corona Virus Crisis in Delhi: दिल्लीच्या मटियामहलचे आमदार शोएब इक्बाल यांनी हे वक्तव्य दिल्लीमध्ये सध्या कोरोना संकटामुळे गंभीर बनलेल्या परिस्थितीवर केले आहे. त्यांनी उच्च न्यायालयालाही विनंती केली आहे. दिल्लीत अव्यवस्था पसरत आहे, यामुळे इथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचे संकट (Corona Virus in Delhi) दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दिल्लीत काही दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. ३ मे पर्यंत असलेला लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे सत्ताधारी आपमध्ये असंतोषाचा आवाज येऊ लागला आहे. आपचे आमदार शोएब इक्बाल यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. (Aap MLA shoaib iqbal urges to High court for President's rule in Delhi.)
दिल्लीच्या मटियामहलचे आमदार शोएब इक्बाल यांनी हे वक्तव्य दिल्लीमध्ये सध्या कोरोना संकटामुळे गंभीर बनलेल्या परिस्थितीवर केले आहे. त्यांनी उच्च न्यायालयालाही विनंती केली आहे. दिल्लीत अव्यवस्था पसरत आहे, यामुळे इथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांना ना औषध मिळत आहे, ना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन. लोकांचे कोणीच ऐकत नाहीय. मला दु:ख होतेय की आम्ही कोणाचीच मदद करू शकत नाही आहोत. मी सहा वेळा आमदार राहिलो आहे. मात्र, कोणती ऐकत नाहीय. मला तर उच्च न्यायालयाने इथे राष्ट्रपती राजवट लावावी, नाहीतर इथे रस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसतील, असे त्यांनी म्हटले.
शोएब इक्बाल यांनी सांगितले की, आम्हाला केंद्राकडून काहीच सहकार्य मिळत नाहीय. यामुळे जर केंद्राच्याच हातात सारे गेले तर काम होईल. तीन महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लावा.
दिल्लीमध्ये कोरोनामुळे हालत खूपच बिकट बनली आहे. ऑक्सिजनच्या टंचाईमुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरु आहे. आता राज्य सरकारच्याच आमदाराने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरोनाच्या या लाटेने दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेची त्रेधा उडविली आहे. लोकांना खूप संघर्ष करून हॉस्पिटलांमद्ये ना बेड मिळत आहे ना ऑक्सिजन. दिल्ली सरकार वेबसाईटवर बेड रिकामे असल्याचे दावे करत आहे, मात्र प्रत्यक्षात रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक ह़ॉस्पिटलचे उंबरे झिझवावे लागत आहेत.