"मोठ्या नेत्याने भाजपात येण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रीपदाची दिली ऑफर"; आप खासदाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 08:58 PM2021-12-05T20:58:29+5:302021-12-05T21:05:16+5:30

AAP Bhagwant Mann And BJP : भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने भाजपात प्रवेश करण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप भगवंत मान यांनी केला आहे.

aap mp bhagwant mann says bjp offered him money cabinet berth to switch party | "मोठ्या नेत्याने भाजपात येण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रीपदाची दिली ऑफर"; आप खासदाराचा आरोप

"मोठ्या नेत्याने भाजपात येण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रीपदाची दिली ऑफर"; आप खासदाराचा आरोप

googlenewsNext

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे पंजाबमधील खासदार भगवंत मान (AAP Bhagwant Mann) यांनी भाजपावर (BJP) गंभीर आरोप केला आहे. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने भाजपात प्रवेश करण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप भगवंत मान यांनी केला आहे. यावर आता भाजपाने प्रतिक्रिया देत त्या नेत्याचं नाव जाहीर करण्याचं आव्हान दिलं आहे. तसेच भगवंत मान आपमधील त्यांचं महत्त्व वाढवण्यासाठी असा दावा करत असल्याचा आरोप केला. 

पंजाबमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भगवंत मान यांनी "मला भाजपाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला. त्यांनी भाजपात येण्यासाठी तुम्ही काय घ्याल? असा प्रश्न विचारला. तुम्हाला किती पैसे हवेत ते सांगा. तुम्ही खासदार आहात आणि एकमेव खासदार आहात त्यामुळे तुमच्यावर पक्षांतर्गत बंदीचा कायदा लागू होणार नाही. तुम्ही भाजपात या. तुम्हाला आम्ही कॅबिनेट मंत्रीपद देऊ" असं म्हटलं आहे. 

"मी एका मोहिमेवर आहे, कमिशनवर नाही"

"मी भाजपाच्या नेत्यांना सांगितलं की मी एका मोहिमेवर आहे, कमिशनवर नाही. मी भरपूर पैसा देणाऱ्या करियरच्या सर्वोच्च स्थानी असताना ते सोडून पंजाबच्या हक्कासाठी राजकारणात आलो आहे. आतापर्यंत घाम आणि रक्त आटवून आप पक्ष निर्माण केला आहे. पंजाबच्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे" असं देखील भगवंत मान यांनी म्हटलं. ऑफर देणाऱ्या नेत्याचं नाव सार्वजनिक करावं असं जाहीर आव्हान हे भाजपाकडून मान यांनी देण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: aap mp bhagwant mann says bjp offered him money cabinet berth to switch party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.