बनावट सह्यांच्या वादात आप खासदार राघव चढ्ढांना दणका! राज्यसभेतून केले निलंबित; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 03:01 PM2023-08-11T15:01:40+5:302023-08-11T15:02:56+5:30
बनावट स्वाक्षरी प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांनी बनावट सह्यांच्या प्रकरणात राज्यसभेने निलंबित केले आहे. राज्यसभेत आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्याविरोधात प्रस्ताव मांडला जात आहे. सभागृहातील त्यांच्या वर्तनामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अमित शहांनी ३ कायदे रद्द करण्याची केली घोषणा, CrPC दुरुस्ती विधेयक मांडले; जाणून घ्या काय होणार बदल
राघव यांच्या विरोधात ठराव मांडला जात आहे. राघव चढ्ढा यांच्या वर्तनाचे वर्णन अत्यंत निषेधार्ह असल्याचे यात म्हटले आहे. राज्यसभेत भाजप खासदार पियुष गोयल यांनी राघव चढ्ढा यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला. ते म्हणाले, ही अत्यंत गंभीर बाब असून, सदस्याच्या नकळत त्यांचे नाव ज्या प्रकारे यादीत टाकण्यात आले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे.
#WATCH | Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar announces the suspension of AAP MP Sanjay Singh
— ANI (@ANI) August 11, 2023
He says, "...I find it expedient to refer the matter to the Committee of Privileges...suspension order dated 24th July 2023 may continue beyond the current session till the Council has… pic.twitter.com/WoOCPiaZYa
पीयूष गोयल म्हणाले की, राघव चढ्ढा बाहेर गेले आणि म्हणाले की त्यांनी काहीही चुकीचे केले नाही आणि या प्रकरणावर ते ट्विटही करत राहिले. विशेषाधिकार भंगाचा अहवाल येईपर्यंत राघव चढ्ढा यांचे निलंबन कायम राहणार आहे.
संजय सिंग यांनी ज्या पद्धतीने वागले तेही अत्यंत निषेधार्ह आहे. निलंबनानंतरही ते सभागृहात बसून राहिले. त्यामुळे सभागृहाचे कामकाजही तहकूब करावे लागले. हा खुर्चीचा अपमान आहे. संजय सिंह आतापर्यंत ५६ वेळा वेलमध्ये आले आहेत, यावरून त्यांना सभागृहाचे कामकाज विस्कळीत करायचे आहे. राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत संजय सिंह निलंबित राहणार आहेत.