ॅओपन स्पेस मनपा घेणार ताब्यात समिती नाहीच: लवकरच प्रक्रिया
By admin | Published: March 22, 2016 12:39 AM2016-03-22T00:39:41+5:302016-03-22T00:39:41+5:30
जळगाव : विकसीत न केलेल्या ओपन स्पेस महापालिका ताब्यात घेणार असून लवकरच त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र यासाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याचे वृत्त आहे.
Next
ज गाव : विकसीत न केलेल्या ओपन स्पेस महापालिका ताब्यात घेणार असून लवकरच त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र यासाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याचे वृत्त आहे. शहरातील विविध भागातील ओपन स्पेस सार्वजनिक संस्थांना देण्यात आल्या आहेत. काही संस्थांनी या ठिकाणी बांधकाम करून त्याचा वापर केवळ आपल्या सभासदांपर्यंतच मर्यादीत ठेवल्याचे लक्षात आले आहे. तर काही संस्थांनी जागा घेतल्या मात्र त्यावर काहीही काम न करता या जागा पडून असल्याचेच लक्षात आले आहे. महापालिका प्रथम ज्या जागा ताब्यात घेऊन त्यावर काहीही कामकाज केले नाही असे ओपन स्पेस ताब्यात घेणार आहे. लवकरच संबंधित संस्थांना तशा नोटीस बजावल्या जाणार असल्याची माहिती उपमहापौर ललित कोल्हे यांनी दिली. त्यानंतर ज्या संस्थांनी बांधकाम केले आहे त्यांच्याबद्दल निर्णय होईल. समिती नाहीचओपन स्पेसबाबतच्या निर्णयासाठी समिती गठित करण्याचा मनपाचा निर्णय होता. मनसे आघाडीकडून त्या संदर्भात नगररचना विभागास पत्रही देण्यात आले होते. मात्र अद्यापही त्या पत्राची दखल घेतली गेली नसल्याचेच लक्षात येते. समिती गठित करण्याबाबत आता पाठपुरावा केला जाणार आहे. नोटीस देऊन या संस्थांकडून जागा ताब्यात घेतल्या जातील त्यानंतर त्या परिसरातील कॉलनीतील रहिवाशांकडून प्रस्ताव घेऊन या जागांवर उद्यान विकसीत करण्याचे प्रस्तावित आहे. ------इन्फोरामानंद नगर भागातून प्रस्तावरामानंद नगरनजीकच्या ओपन स्पेसमध्ये उद्यान निर्मितीबाबत परिसरातील नागरिकांकडून प्रस्ताव आहे. तसेच या ठिकाणची काही जागा मिळावी म्हणून रामानंद नगर पोलिसांचेही पत्र आहे. त्यांनाही काही जागा देण्यात येणार असून उर्वरित जागेवर जिम्नॅशियम व उद्यान असे प्रस्तावित असल्याचे ललित कोल्हे यांनी सांगितले.