AAP CM Candidate For Punjab: हे आहेत 'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, लवकरच होणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 04:21 PM2022-01-04T16:21:56+5:302022-01-04T16:28:23+5:30

AAP CM Candidate For Punjab: आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठ्या विजयाचा दावा केला आहे.

AAP | Punjab Assembly Election | Bhagwant mana would be CM Candidate For Punjab Election | AAP CM Candidate For Punjab: हे आहेत 'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, लवकरच होणार घोषणा

AAP CM Candidate For Punjab: हे आहेत 'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, लवकरच होणार घोषणा

googlenewsNext

चंदीगड:पंजाब विधानसभा निवडणूक 2022 साठी (Punjab Assembly Election 2022) आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party)  मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीच्या बैठकीत आप खासदार भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

मान यांच्या नावावर शिक्कामोर्तब- सूत्र

भगवंत मान आपचे पंजाबमधील सक्रीय नेते असून, त्यांच्या मागे मोठा जनाधार आहे. तसेच, त्यांची ख्याती राज्यात पसरली असल्यामुळे त्यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे. भगवंत मान सध्या पंजाबच्या संगरुर लोकसभा मतदारसंघातून आपचे खासदार आहेत. पंजाबमधील निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्ष सातत्याने राज्यात पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी स्वतः पंजाबमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या आहेत.

आपकडून मोठी आश्वासने 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात आम आदमी पक्षाने दिल्लीच्या धर्तीवर अनेक आश्वासने दिली आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास राज्यातील 99 लाख महिलांच्या खात्यात दरमहा 1000 रुपये दिले जातील, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले. ही मदत विधवा आणि वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त दिली जाणार आहे. जर घरात चार महिला असतील तर प्रत्येकाला 1000 रुपये मिळतील.

यासोबतच पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर 24 तासांच्या आत प्रत्येक व्यक्तीला घरगुती वापरासाठी 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासनही आम आदमी पक्षाकडून देण्यात आले आहे. अलीकडेच चंदीगड महानगरपालिकेत 35 पैकी 14 जागांवर AAPने ज्या प्रकारे विजय मिळवला आहे, त्यामुळे पंजाबमधील AAP कार्यकर्ते उत्साहित आहेत. 
 

Web Title: AAP | Punjab Assembly Election | Bhagwant mana would be CM Candidate For Punjab Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.