‘आप’ची बंडाळी न्यायालयात
By admin | Published: March 29, 2015 01:31 AM2015-03-29T01:31:48+5:302015-03-29T01:31:48+5:30
आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घटनाबाह्ण आणि अवैध असल्याचे बंडखोर रेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घटनाबाह्ण आणि अवैध असल्याचे बंडखोर रेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे. आपल्या निष्कासनाविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याची शक्यता या नेत्यांनी फेटाळून लावली नाही. ‘आम्ही न्यायालय किंवा निवडणूक आयोगाकडे धाव घेऊ शकतो किंवा राष्ट्रीय कायरकारिणीची दुसरी बैठकही बोलावू शकतो, हे खरे आहे. सर्व पर्याय खुले आहेत,’ असे भूषण यांनी पत्रकारांना सांगितले.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर यादव यांनी रामदास यांचे पक्ष नेतृत्वाला लिहिलेले पत्र सार्वजिनक केले. ‘संघर्ष टाळण्यासाठी बैठकीला उपस्थित राहू नका’, असा सल्ला रामदास यांना ‘आप’कडून देण्यात आला होता. त्याबाबत रामदास यांनी या पत्रात पक्षाकडे विचारणा केली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू असताना केजरीवाल आणि बंडखोर नेत्यांचे पक्षाचे शेकडो कार्यकर्ते चॅलिस्टा रिसॉर्टबाहेर जमले होते आणि ते परस्परांविरुद्ध घोषणा देत होते. यादव आणि भूषण यांच्या हकालपट्टीचे वृत्त बैठकीबाहेर येताच केजरीवाल समर्थकांनी जल्लोष केला. (प्रतिनिधी)
मेधा पाटकर यांची सोडचिठ्ठी
आम आदमी पार्टीच्या उभारणीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्या हकालपट्टीचा निषेध नोंदवत मेधा पाटकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष नेतृत्वावर टीका करत पाटकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ‘आप’मध्ये सध्या सुरु असलेला वाद आणि याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भूमिका अनपेक्षित असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना धक्काबुक्की होणे, ही दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांचे समर्थन करत पाटकर यांनी केजरीवाल यांच्यावर तोफ डागली. निष्ठावान नेत्यांना देण्यात आलेली वागणूक अत्यंत दुर्दैवी असून पक्षाला भविष्यात त्याचा तोटा सहन करावा लागेल, असेही त्या म्हणाल्या.
च्वाराणसी : आम आदमी पार्टीने दिल्लीच्या जनतेला दिलेली आश्वासने पाळली पाहिजे आणि पक्षाने परिपक्वता सोडू नये. अपरिपक्व राजकारण करून संधी गमावू नये, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ‘आप’च्या अंतर्गत कलहावर भाष्य करताना जेटली बोलत होते.
च्दिल्लीकरांनी मोठ्या आशेने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या बाजूने मतदान केले आहे आणि त्यांना आता अशाप्रकारच्या राजकारणाची अपेक्षा नाही. एक नव्या पद्धतीचे राजकारण समोर आले आहे. एक नेता बोलतो आणि त्याचे म्हणणे टॅप केले जाते. असे राजकारण मी कधी पाहिलेले नाही, असे जेटली म्हणाले.