आता हिमाचल आणि गुजरात निवडणुकीवर 'AAP' चे लक्ष; केजरीवाल-भगवंत मान उतरणार प्रचारासाठी मैदानात?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 04:50 PM2022-03-14T16:50:26+5:302022-03-14T16:51:48+5:30

AAP : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे होणारे मुख्यमंत्री भगवंत मान हे दोन्ही राज्यांमध्ये प्रचार करणार असल्याचे समजते. 

aap resounding victory in punjab now arvind kejriwal and bhagwant mann will campaign for himachal pradesh and gujarat election | आता हिमाचल आणि गुजरात निवडणुकीवर 'AAP' चे लक्ष; केजरीवाल-भगवंत मान उतरणार प्रचारासाठी मैदानात?

आता हिमाचल आणि गुजरात निवडणुकीवर 'AAP' चे लक्ष; केजरीवाल-भगवंत मान उतरणार प्रचारासाठी मैदानात?

Next

नवी दिल्ली : पंजाब निवडणुकीत आम आदमी पार्टीने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या विजयानंतर आम आदमी पार्टीच्या नजरा आता नोव्हेंबर 2022 मध्ये होणाऱ्या हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकांवर लागल्या आहेत. या दोन राज्यांच्या निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीने आतापासूनच रणनीती बनवण्यास सुरुवात केली असून, इतकंच नाही तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे होणारे मुख्यमंत्री भगवंत मान हे दोन्ही राज्यांमध्ये प्रचार करणार असल्याचे समजते. 

आतापर्यंत हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये काँग्रेस भाजपसमोर सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, आता आम आदमी पार्टी उतरल्यानंतर ही निवडणूकही तिरंगी होऊ शकते, कारण पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या विजयाने इतर राज्यांतील जनतेवर चांगलाच प्रभाव पडला आहे. हिमाचल प्रदेश हे पंजाबला लागून असलेले राज्य आहे, त्यामुळे आम आदमी पार्टी हिमाचलच्या लोकांच्या मनात सहज स्थान निर्माण करू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

दुसरीकडे, गुजरातमधील सुरत नगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवला होता, त्यामुळे गुजरात निवडणुकीतही काही जागा जिंकता येतील असे आम आदमी पार्टीला वाटते. मात्र, गुजरातमधील 182 आणि हिमाचल प्रदेशातील 68 जागांवर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी किती जागा लढवणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत
दरम्यान, पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 117 जागांवर निवडणूक लढवली होती. 117 पैकी 92 जागा आम आदमी पार्टीने जिंकल्या आहेत. त्यामुळे आता पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार बनणार आहे. निवडणुकीपूर्वीच आम आदमी पार्टीकडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, प्रकाशसिंग बादल आणि अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांचा आम आदमी पार्टीच्या उमेदवारांकडून पराभव झाला आहे. 

Web Title: aap resounding victory in punjab now arvind kejriwal and bhagwant mann will campaign for himachal pradesh and gujarat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.