Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 07:30 PM2024-10-26T19:30:29+5:302024-10-26T19:31:27+5:30

AAP Sanjay Singh And BJP : संजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मोठा दावा केला आहे.

AAP Sanjay Singh lashes out at BJP over attack on Arvind Kejriwal says they want tried to kill | Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप

Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मोठा दावा केला आहे. "भाजपाअरविंद केजरीवाल यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, ते अरविंद केजरीवाल यांचा जीव घेण्यासाठीच प्रयत्न करत आहेत" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला. 

संजय सिंह म्हणाले की, "जेलमध्ये केजरीवाल यांचं इन्सुलिन बंद करण्यात आलं होतं. जेव्हा SC ने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला, तेव्हा ते आपचा प्रचार करत आहेत. भाजपा त्यांच्यावर हल्ला करत आहे. तुमच्या द्वेषाला काही मर्यादा आहे का? किती द्वेष कराल. तुम्ही केजरीवाल यांना हरवू शकत नाही, म्हणूनच तुम्हाला केजरीवालांना संपवायचं आहे."

"विकासपुरीत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी भाजपाचे गुंड आले असून या घटनेत पोलिसांचा देखील हात आहे. हल्लेखोर रोहित सहरावत हा दिल्ली भाजपा युवा विंगचा उपाध्यक्ष आहे. दुसरा हल्लेखोर अरुण ढल हा देखील भाजयुमोचा आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे रोहित सहरावत हा मुख्य व्यक्ती आहे. रोहित सहरावतचे फोटो गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत आहेत."

"तो व्हिडिओमध्ये कबूल करत आहे की, अरविंद केजरीवाल कुठेही गेले तरी ते हल्ला करतील. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष सचदेवा या हल्लेखोरांचा बचाव करत आहेत. तुम्ही अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा प्रयत्न केला. जर केजरीवाल यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी भाजपा जबाबदार असेल" असं म्हणत संजय सिंह यांनी जोरदार टीका केली आहे. 
 

Web Title: AAP Sanjay Singh lashes out at BJP over attack on Arvind Kejriwal says they want tried to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.