लेखी माफी माग अन्यथा...; गौतम गंभीरला आपकडून 24 तासांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 10:28 PM2019-05-10T22:28:25+5:302019-05-10T22:29:08+5:30

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रकं वाटल्यावरुन मोठा वाद निर्माण झाला.

AAP sends legal notice to BJP & Gautam Gambhir make apology within 24 hrs | लेखी माफी माग अन्यथा...; गौतम गंभीरला आपकडून 24 तासांची मुदत

लेखी माफी माग अन्यथा...; गौतम गंभीरला आपकडून 24 तासांची मुदत

Next

नवी दिल्ली : भाजपाचा पूर्व दिल्लीतील उमेदवार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आपच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांच्याबाबतचा आक्षेपार्ह मजकूर भाजपा आणि गंभीरने वाटल्याचा आरोप केला होता. याबाबत गंभीर आणि भाजपाने पुढील 24 तासांत लेखी माफी मागावी आणि वृत्तपत्रांमधून खरे आणि योग्य वस्तुस्थिती मांडावी, अशी कायदेशीर नोटीसच पाठविली आहे. 


पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रकं वाटल्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. याबाबत आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत हा मजकूर वाचून दाखविला होता. यानंतर त्यांना रडू कोसळले होते. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे म्हटले होते. तर आतिशी यांनी या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

या प्रकरणी आपने भाजपा आणि गौतम गंभीरविरोधात नोटीस बजावली आहे. यामध्ये येत्या 24 तासांत लेखी माफी मागावी आणि त्या पत्रकातील मजकुराबाबत खरे, योग्य बाबी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध कराव्यात असे सांगितले आहे. 




या आरोपांवर गंभीरने टोकाचे पाऊल उचलले असून आतिशी यांच्याबाबत मी जर असा प्रकार केला हे जर केजरीवाल आणि आपने सिद्ध केल्यास लोकांच्यासमोर स्वत:ला फाशी लावून घेणार असल्याचे ट्विट त्याने केले आहे. तसेच जर केजरीवाल अपयशी ठरले तर त्यांनी राजकारण सोडावे, असे आव्हानही दिले आहे. 



 

 

Web Title: AAP sends legal notice to BJP & Gautam Gambhir make apology within 24 hrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.