"हरियाणातील जनता अन्यायाचा बदला घेईल"; सुनीता केजरीवाल यांचा मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 07:31 PM2024-08-04T19:31:41+5:302024-08-04T19:39:21+5:30

AAP Sunita Kejriwal And Narendra Modi : आम आदमी पक्षाच्या (आप) रॅलीला संबोधित करताना सुनीता केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

AAP Sunita Kejriwal attacks Narendra Modi in faridabad rally haryana assembly elections | "हरियाणातील जनता अन्यायाचा बदला घेईल"; सुनीता केजरीवाल यांचा मोदींवर हल्लाबोल

"हरियाणातील जनता अन्यायाचा बदला घेईल"; सुनीता केजरीवाल यांचा मोदींवर हल्लाबोल

हरियाणातील फरिदाबादमध्ये आम आदमी पक्षाच्या (आप) रॅलीला संबोधित करताना सुनीता केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "मोदींना जनतेचं हित पाहवलं नाही, लोकांच्या कामाची पर्वा नाही आणि त्यांनी हरियाणाचे सुपुत्र अरविंद केजरीवाल यांना अटक केली. पण हरियाणातील जनता मोदींच्या या अन्यायाचा बदला घेईल" असं म्हणत सुनीता केजरीवाल यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

"देशात असा कोणताही पक्ष नाही ज्यांनी मोहल्ला क्लिनिक, रुग्णालय आणि चांगल्या शाळा बांधल्या असतील. जनतेला २४ तास मोफत वीज देणारा पक्ष नाही. तुमच्या मुलाने दिल्ली आणि पंजाब बदलला आहे. मोदीजींना जनतेच्या हिताची आणि कामाची पर्वा नव्हती, त्यांनी हरियाणाचे सुपुत्र अरविंद केजरीवाल यांना अटक केली, पण हरियाणातील जनता मोदीजींच्या या अन्यायाचा बदला घेईल, केजरीवाल यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेईल."

"तुमच्या मुलाची सर्व कामं बंद पाडण्यासाठी खोटी केस करून त्याला तुरुंगात टाकलं. मोदीजी म्हणतात, केजरीवाल चोर आहेत. मी म्हणते केजरीवाल चोर असतील तर जगात कोणीही प्रामाणिक नाही. मोदीजींनी केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं नाही तर त्यांनी हरियाणाच्या मुलाला जेलमध्ये टाकलं आहे."

"मी हरियाणाची सून आहे, मी सर्वांना विचारतेय की, तुम्ही हे सर्व शांतपणे पाहत राहणार आहात का? तुमचा मुलगा केजरीवाल सिंह आहे. ते मोदींपुढे झुकणार नाहीत. हरियाणा कुणापुढे झुकत नाही. तुम्ही हे शांतपणे सहन कराल का?" असं म्हणत सुनीता केजरीवाल यांनी मोदींवर घणाघात केला आहे. 

सुनीता केजरीवाल यांनी राज्यातील सर्व घरांना २४ तास मोफत वीज दिली जाईल. गावांमध्ये मोहल्ला क्लिनिक उभारले जातील आणि लोकांवर मोफत उपचार केले जातील. हरियाणाच्या सरकारी शाळा उत्कृष्ट बनवल्या जातील, जिथे उत्तम शिक्षण दिले जाईल. हरियाणातील माता-भगिनींना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. प्रत्येक बेरोजगार तरुणाला रोजगार दिला जाईल असंही म्हटलं आहे. 
 

Web Title: AAP Sunita Kejriwal attacks Narendra Modi in faridabad rally haryana assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.