‘आप’ला राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा; नेमक्या काय आहेत अटी?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 09:26 AM2022-12-09T09:26:57+5:302022-12-09T10:08:09+5:30
चार राज्यांत राज्य पक्षाचा दर्जा मिळालेला पक्ष राष्ट्रीय पक्ष होऊ शकतो.
अहमदाबाद - दिल्लीनंतर आम आदमी पक्षाने (आप) आता गुजरातमध्येही प्रवेश केला आहे. गुजरातमध्ये ५ जागांवर विजय मिळाल्याने आपला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी निकष काय आहेत तसेच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचे महत्त्व काय? हे जाणून घेऊ...
काय आहेत नेमक्या अटी?
तीन राज्यांतील लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागांवर विजय अपरिहार्य आहे. लोकसभा किंवा विधानसभेसाठी आवश्यक असलेल्या चार राज्यांमध्ये किमान ६ टक्के मतदान होणे आवश्यक आहे. चार राज्यांत राज्य पक्षाचा दर्जा मिळालेला पक्ष राष्ट्रीय पक्ष होऊ शकतो.
दर्जा मिळाला पण, भाजपला फायदा
आपच्या गुजरात एन्ट्रीमुळे काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान झाले. फायदा भाजपला झाला. बहुसंख्य लढती तिरंगी झाल्या. भाजपचे परंपरागत मतदान पक्षापासून दूर झाले नाही परंतु काँग्रेसचे मतदार विभागले गेले आणि भाजपच्या जागा आपोआप वाढल्या.
८ राष्ट्रीय पक्ष
भाजप
काँग्रेस
बसपा
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्ष
राष्ट्रवादी
तृणमूल