'आप' देशभरात १०० जागा लढवणार, २५ जागी विजयाचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:47 AM2018-09-24T05:47:20+5:302018-09-24T05:47:41+5:30
भल्याभल्या राजकीय पंडितांना चक्रावून दिल्लीत विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने २०१९ साली होणाºया लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
नवी दिल्ली - भल्याभल्या राजकीय पंडितांना चक्रावून दिल्लीत विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने २०१९ साली होणाºया लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. देशभरात १०० जागा लढवून २५ ठिकाणी विजयी होण्याची रणिनती पक्षाने आखली आहे. देशभरात बिगरभाजपा सकार स्थापनेसाठी मदत करण्याची आपची भूमिका असल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोणतेही राजकीयदृष्ट्या वादग्रस्त विधान केले नाही. त्यांनी कोणत्याही पक्षावर टीका केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र त्यांनी थेट आव्हाना दिले. नायब राज्यपालांमार्फत राज्यकारभारात ढवळाढवळ करण्यापासून ते 'राफेल' प्रकरणात कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली, या कडे पक्ष सूत्रांवी लक्ष वेधले. आम आदमी पक्षामुळे लोकांना बिगर भाजप, बिगर काँग्रेसचा पहिल्यांदाच पर्याय मिळाला. त्यावरच मते मागणार असल्याचे सूतोवाच सूत्रांनी केले.
केजरीवाल यांना पक्षाला दिल्लीतून आता बाहेर न्यायचे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत १०० जागा लढवून किमान २५ ठिकाणी विजयाची रणनिती आतापासूनच आखण्यात येत आहे. दिल्ली, हरियाण व पंजाबमध्ये जास्तीत जास्त जागांवर विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा सूत्रांनी केला. दिल्लीत व्यापाºयांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत भरघोस मते दिली. व्यापारी सध्या सीलिंगने त्रस्त आहेत. सातही ठिकाणी आपचे खासदार झाले असते तर सीलिंगचा प्रश्न सोडवला असता, असे वक्तव्य केजरीवालांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे दिल्लीत व्यापाºयांनादेखील आप भरघोस आश्वासने देणार आहे.
या राज्यांमध्ये लढवणार निवडणूक
दिल्ली, हरियाणा, पंजाब व्यतिरिक्त यंदा वर्षाखेर विधानसभा निवडणूक होणाºया मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढवरदेखील पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे. बिहार, उत्तर प्रदेश व गुजरातमध्येही काही जागा लढवण्यात येतील. पंजाबमधूनच पक्षाचे चार खासदार निवडणून आले होते.
हरियाणचे प्रदेश अध्यक्ष नवीन जयहिंद यांच्यावर केजरीवालांना मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यामुळेच केजरीवाल यांनी हरियाणात अलीकडेच सभा घेतल्या होत्या. संघटनात्मक बांधणीसाठी ते नियमितपणे हरियाणाचा प्रवास करतात.