राजस्थानमध्ये आप 'इंडिया' विरोधात निवडणूक लढविणार; सर्व २०० जागांवर उमेदवार देण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 08:28 AM2023-08-19T08:28:33+5:302023-08-19T08:29:05+5:30

आपचे राजस्थान प्रभारी विनय मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. राजस्थानमधील आमची राज्य युनिट निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे, असे ते म्हणाले.

AAP will contest elections against 'India' in Rajasthan; Preparing to nominate candidates for all 200 seats | राजस्थानमध्ये आप 'इंडिया' विरोधात निवडणूक लढविणार; सर्व २०० जागांवर उमेदवार देण्याची तयारी

राजस्थानमध्ये आप 'इंडिया' विरोधात निवडणूक लढविणार; सर्व २०० जागांवर उमेदवार देण्याची तयारी

googlenewsNext

राजस्थानमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. याचे वारे सुरु झाले असून सत्ताधारी काँग्रेसमध्ये दोन गटांत तिकीटावरून धुसफुस वाढली आहे. याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता असून आपही इंडिया आघाडी सोडून २०० च्या २०० जागांवर एकट्याने निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. आता इंडिया आघाडीतून लढायचे की एकटे हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ठरवायचे आहे. 

आपचेराजस्थान प्रभारी विनय मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. राजस्थानमधील आमची राज्य युनिट निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. जमिनीवर उतरून आम्ही चांगले काम करत आहोत. आम्ही प्रत्येक गावात 11-11 लोकांची टीम तयार करत आहोत. 22 ऑगस्ट रोजी मी प्रदेशाध्यक्षांना येथे बोलावले आहे. संघटनेचे सरचिटणीस संदीप पाठक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही उमेदवारांची पहिली यादी अंतिम करून ती अरविंद केजरीवाल यांच्याकडे सोपवू, असे मिश्रा म्हणाले. 

आता अरविंद केजरीवाल उमेदवारांच्या नावांची कधी घोषणा करतात हे पहावे लागेल. या महिन्यातच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे मिश्रा यांनी सांगितले. इतर पक्षांचे बडे नेतेही आमच्या संपर्कात आहेत, ज्यांना आम आदमी पक्षाने निवडणूक लढवायची आहे, असा दावाही त्यांनी केला. 

राजस्थानच्या विधानसभा जागा अ, ब आणि क अशा तीन श्रेणींमध्ये विभागल्या आहेत. अ श्रेणी अशी आहे जिथे आपचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवण्यास तयार आहेत. अशा जागांची संख्या 70 आहे. ब ही श्रेणी आहे, जिथे तयारी आहे पण उमेदवारांबाबत संभ्रम आहे. क वर्ग, जिथून आतापर्यंत एकही उमेदवार समोर आलेला नाही.


 

Web Title: AAP will contest elections against 'India' in Rajasthan; Preparing to nominate candidates for all 200 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.