आपचा रंगेल आमदार! महिलेला हॉटेलात घेऊन गेला, पती मागून आला; तोंड लपवून पळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 02:18 PM2023-06-22T14:18:28+5:302023-06-22T14:23:37+5:30

AAP MLA viral Video: गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पाच जागा जिंकत आम आदमी पक्षानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र तेव्हापासून सुरू झालेल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही आहेत.

AAP's Rangel MLA! took the woman to the hotel, the husband followed; He ran away hiding his face | आपचा रंगेल आमदार! महिलेला हॉटेलात घेऊन गेला, पती मागून आला; तोंड लपवून पळाला

आपचा रंगेल आमदार! महिलेला हॉटेलात घेऊन गेला, पती मागून आला; तोंड लपवून पळाला

googlenewsNext

गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पाच जागा जिंकत आम आदमी पक्षानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र तेव्हापासून सुरू झालेल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. पक्षाचे युवा नेते युवराज सिंह जडेजा तुरुंगात आहेत. तर आता पक्षाच्या एका आमदाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा आमदार एका महिलेसोबत दिसत आहे. महिलेनं आपला चेहरा कपड्याने झाकलेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेचा पती आल्यावर सदर आमदार तोंड लपवून पळाल्याचे दिसत आहे. आप आमदाराच्या महिलेसोबतच्या व्हिडीओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सूरतमधील एका हॉटेलमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. आम आदमी पक्षाचे आमदार एका महिलेसोबत हॉटेलच्या गेस्ट हाऊसमध्ये आले. तिथे त्यांनी रिसेप्शनवर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ते त्या महिलेला घेऊन खोलीत आले. मात्र या महिलेचा पती मागून आल्याने या आमदारांनी तोंडावर रुमाल धरून स्वत:ची ओळख लपवली. या व्हिडीओमध्ये दिसत असलेले व्यक्ती हे आपचे आमदार भूपत भयाणी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या व्हिडीओवर आपने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडीओ हा ८ जूनचा आहे. हा व्हिडीओ आणि महिलेसोबत हॉटेलमध्ये जाणे आणि तिथून बाहेर येण्याच्या दाव्यावर आपच्या आमदारांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भूपत भयाणी हे विसावदर मतदारसंघातील आमदार आहेत. पाटिदार समुदायाशी संबंधित भयाणी हे त्यांच्या विभागात लोकप्रिय आहेत. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात गेलेले आमदार हर्षद रिबाडिया यांना पराभूत केलं होतं.  

Web Title: AAP's Rangel MLA! took the woman to the hotel, the husband followed; He ran away hiding his face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.