‘आप’चे दोन खासदार पक्षातून निलंबित
By admin | Published: August 31, 2015 12:53 AM2015-08-31T00:53:40+5:302015-08-31T00:53:40+5:30
आम आदमी पार्टीने शनिवारी पंजाबमधील दोन खासदारांना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी तडकाफडकी निलंबित केले. धरमवीरा गांधी आणि हरिंदरसिंग खालसा
Next
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने शनिवारी पंजाबमधील दोन खासदारांना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी तडकाफडकी निलंबित केले. धरमवीरा गांधी आणि हरिंदरसिंग खालसा अशी निलंबित खासदारांची नावे आहेत. पक्षविरोधी कारवाया करणे आणि पंजाबच्या सत्तारूढ शिरोपणी अकाली दल-भाजपा आघाडी सरकारशी हातमिळवणी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. खा. गांधी यांनी बंडखोर नेते योगेंद्र यादव यांचे समर्थन केले होते. ‘आप’च्या राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत या दोन्ही खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘आप’चे लोकसभेत चार खासदार असून, ते चारही जण पंजाबमधून निवडून आलेले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)