"तीराप्रमाणेच आमचा आरवही व्हेंटिलेटरवर, त्याच्या आईला ब्लड कॅन्सर; आम्हालाही मदत मिळेल का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 08:44 AM2021-02-12T08:44:51+5:302021-02-12T08:45:29+5:30

तीराप्रमाणेच आरवलादेखील आर्थिक मदत हवीय. त्यासाठी त्याच्या कुटुंबानं आवाहन केलंय.

aarav suffering from SMA Type 1 like teera kamat need help from people and government | "तीराप्रमाणेच आमचा आरवही व्हेंटिलेटरवर, त्याच्या आईला ब्लड कॅन्सर; आम्हालाही मदत मिळेल का?"

"तीराप्रमाणेच आमचा आरवही व्हेंटिलेटरवर, त्याच्या आईला ब्लड कॅन्सर; आम्हालाही मदत मिळेल का?"

Next

स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी टाईप-१ या दुर्धर आजाराचा सामना करणाऱ्या चिमुकल्या तीरा कामतला नवजीवन मिळणार आहे. सोशल मीडियातून पुढे आलेले अनेक दात्यांचे हात, त्यानंतर सरकारनं परदेशातून आणाव्या लागणाऱ्या इंजेक्शनवरील कर माफ केल्यानं तीराच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला. मात्र देशात तीरासारखीच आणखीही काही बालकं आहेत. त्या लहानग्या जीवांना वाचवण्यासाठी लोकांच्या, सरकारच्या मदतीची गरज आहे.

दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेला चिमुकला आरवदेखील तीराप्रमाणेच स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी टाईप-१ SMA Type-1 आजाराशी झुंज देत आहे. तो सध्या आयसीयूमध्ये आहे. हा आजार मज्जातंतूंशी संबंधित आहे. यामध्ये मज्जातंतू हळूहळू मरू लागतात आणि मेंदूकडून स्नायूंना जाणारे सिग्नल मंदावत जातात. त्यामुळे स्नायूंवरही नियंत्रण राहत नाही. तज्ज्ञांच्या मते, जनुकीय बदलांमुळे होणारा आजार आहे. 

चिमुकल्या तीरा कामतचं १६ कोटींचं इंजेक्शन दोन आठवड्यात मुंबईत; सरकारकडून ५ कोटींचा दिलासा

आरव एसएमए टाईप-१ आजाराचा सामना करत असताना त्याची आई पूजाला ब्लड कॅन्सर झाला. त्यांच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळे कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला. आरवचे बाबा यामुळे खूप खचले आहेत. ते कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे सगळी धावपळ, पैसे जमा करण्याचे प्रयत्न आरवचे मामा अंकुर कुमार करत आहेत. 'बीबीसी मराठी'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

अंकुर कुमार आणि त्यांच्या कुटुंबानं, निकटवर्तीयांनी गेल्या काही महिन्यांत प्रचंड भोगलं आहे. त्यांची व्यथा ऐकून डोळ्यात अक्षरश: पाणी येतं. 'आरव फक्त आठ महिन्यांचा आहे. या आठ महिन्यांता फक्त दोन-तीनदा माय-लेकराची भेट झाली. माझ्या बहिणीला आतापर्यंत साधी सर्दीची गोळीही घ्यावी लागली नव्हती आणि आता ती ल्युकेमियानं ग्रस्त आहे. आम्ही सगळे त्या काळजीत असताना आरवला एसएमए टाईप-१ आजाराचं निदान झालं.' अंकुर यांच्या बोलण्यातून हतबलता जाणवते.

तीराच्या इंजेक्शनसाठी १६ कोटी रुपये जमले; आता हवी मोदी-ठाकरे सरकारची मदत

एसएमए टाईप-१ आजारावर भारतात उपचार नाहीत. त्यासाठी लागणारी औषधं अमेरिकेहून मागवावी लागतात. इंजेक्शनची किंमत १६ कोटींच्या घरात आहे. त्यावर भारत सरकार ६ कोटींचा कर लावतं. तीरा कामतच्या बाबतीत केंद्र सरकारनं हा कर माफ केला. तशीच मदत आपल्यालाही मिळावी, अशी अंकुर यांची अपेक्षा आहे. 'एवढ्या मोठ्या देशाचं भक्कम सरकार आहे, ते आम्हाला मदत करू शकतं. सत्ताधाऱ्यांनी मनावर घेतलं तर फक्त एका तीराला नाही, तिच्यासारख्या अनेकांना जीवदान मिळेल. सरकारला सगळी बालकं सारखीच,' असं बोलत असताना अंकुर त्यांच्या मनात असलेली अपेक्षा बोलून दाखवतात. 

Web Title: aarav suffering from SMA Type 1 like teera kamat need help from people and government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.