Aarogya Setu : आता आरोग्य सेतू अॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस, मिळणार ब्लू शिल्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 05:44 PM2021-05-25T17:44:36+5:302021-05-25T17:47:01+5:30
आरोग्य सेतू अॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस. अॅपद्वारे करता येते आपली लसीकरणासाठी नोंदणी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या देशात १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, आता नागरिकांना आरोग्य सेतु अॅपवरूनही तुमच्या लसीकरणाचं स्टेटस समजणार आहे. आरोग्य सेतू अॅपने ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. जर आपण लसीचा पहिला डोस घेतला असेल तर तुम्हाला एक टीक दिसून येईल. तर जेव्हा तुम्ही लसीचे दोन्ही डोस घ्याल त्यावेळी त्या ठिकाणी दोन निळ्या टीक दिसून येतील.
दरम्यान, आरोग्य सेतू अॅपद्वारे आता लसीकरणाचं स्टेटस पाहता येणार असल्याची माहिती आरोग्य सेतू अॅपकडून ट्विटरद्वारे देण्यात आली. "तुमचं लसीकरण स्टेटस आता आरोग्य सेतू अॅपद्वारे अपडेट केलं जाऊ शकतं. यासाठी लस घ्या आणि ब्लू टीकसह ब्लू शिल्ड मिळवा," असं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. आरोग्य सेतू अॅप भारत सरकारनं गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लाँच केलं होतं.
Now your Vaccination Status can be updated on Aarogya Setu. Get your self vaccinated - Get the Double Blue Ticks and Get the Blue Shield.#SetuMeraBodyguard#IndiaFightsCorona@NICMeity@GoI_MeitY@_DigitalIndia@mygovindia@MoHFW_INDIA@NITIAayogpic.twitter.com/qhJh7t1ukK
— Aarogya Setu (@SetuAarogya) May 25, 2021
CoWIN पोर्टल व्यतिरिक्त आरोग्य सेतू अॅपचा उपयोद कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन आणि स्लॉट बुकिंगसाठी केला जाऊ शकतो. यासाठी युझरला अॅपमध्ये देण्यात आलेल्या CoWIN या आयकॉनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून फोन क्रमांक टाकावा लागेल. यानंतर आलेल्या ओटीपीच्या मदतीनं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. एकदा रजिस्ट्रेशन पूर्ण झालं की त्यानंतर युझर्सना आपलं लसीकरण केंद्र निवडावं लागेल. यासाठी पिन कोडचाही वापर करता येईल. यानंतर तारीख आणि वेळेचीही निवड करता येईल.