...तर बागेश्वर बाबांना दोन कोटींचे हिरे देईन; सुरतेच्या हिरे व्यापाऱ्याचे खुले चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 12:52 PM2023-05-19T12:52:06+5:302023-05-19T12:52:46+5:30

Bageshwar Maharaj : सुरत येथील हिरे व्यापाऱ्याने धीरेंद्र शास्त्री यांना एक आव्हान दिले आहे.

 Abbot Dhirendra Shastri of Bageshwar Dham will visit Gujarat and a diamond merchant from Surat has protested his programme | ...तर बागेश्वर बाबांना दोन कोटींचे हिरे देईन; सुरतेच्या हिरे व्यापाऱ्याचे खुले चॅलेंज

...तर बागेश्वर बाबांना दोन कोटींचे हिरे देईन; सुरतेच्या हिरे व्यापाऱ्याचे खुले चॅलेंज

googlenewsNext

Bageshwar Dham Baba | सुरत : बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. ते आता बिहार दौऱ्यावर असून तिथे त्यांचा कार्यक्रम पार पडत आहे. धीरेंद्र शास्त्री काही दिवसांनी गुजरातमधीलअहमदाबाद, राजकोट आणि सुरत या ठिकाणी भव्य दरबार घेणार आहेत. खरं तर बिहारपाठोपाठ आता गुजरातमध्ये देखील धीरेंद्र शास्त्री यांच्या दौऱ्याला विरोध होत आहेत. अशातच सुरत येथील जनक बाबरिया या हिरे व्यापाऱ्याने शास्त्री यांना एक आव्हान दिले आहे.

बिहारमध्ये मंत्री तेजप्रताप यादव यांच्या विरोधानंतरही धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार पार पडत आहे. सुरतेच्या हिरे व्यापाऱ्याने आव्हान देताना म्हटले की, जर मला त्यांच्या भव्य दरबारात बोलावले गेले तर मी पॉलिश केलेल्या हिऱ्यांचे एक पाकीट घेऊन तिथे जाईन आणि जर त्यांनी मला सांगितले की, त्यात किती पॉलिश केलेले हिरे आहेत, तर मी ते २ कोटी रूपयांच्या हिऱ्यांचे पाकीट त्यांच्या चरणी अर्पण करीन आणि त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचे मान्य करेन.

धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबाराला विरोध
२२ तारखेला बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी गुजरातला जाणार असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले. शास्त्री यांचा दरबार २६ आणि २७ मे रोजी सुरत येथे होणार आहे. या दरबारात चमत्कार, अंधश्रद्धा आणि त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगितले जाते, त्याला उघडपणे विरोध करणार असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.

कार्यक्रम रद्द करण्याची मागणी
शास्त्री यांच्या दरबारात एवढे लोक येत आहेत, कारण सरकार त्यांना प्रोत्साहन देत आहे. पण आम्ही सरकारशी पत्रव्यवहार करणार आहे. सुरत, अहमदाबाद आणि राजकोट येथील दिव्य दरबाराची मान्यता रद्द करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणार असल्याचे व्यापाऱ्याने स्पष्ट केले. 

 


 

Web Title:  Abbot Dhirendra Shastri of Bageshwar Dham will visit Gujarat and a diamond merchant from Surat has protested his programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.