धक्कादायक...! रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर करण्यात आलं होतं अब्दुलचं 'ब्रेनवॉश', अशी होती मंदिरावर हल्ला करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:05 IST2025-03-05T12:05:30+5:302025-03-05T12:05:55+5:30

दोन हँड ग्रेनेड देऊन त्याला मंदिरावर हल्ला करण्यासाठी पाठवले होते. मात्र, यापूर्वीच फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली...

abdul rehman brainwashed for attack on ayodhya ram mandir ram temple | धक्कादायक...! रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर करण्यात आलं होतं अब्दुलचं 'ब्रेनवॉश', अशी होती मंदिरावर हल्ला करण्याची तयारी

धक्कादायक...! रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर करण्यात आलं होतं अब्दुलचं 'ब्रेनवॉश', अशी होती मंदिरावर हल्ला करण्याची तयारी

फरीदाबादमधील पाली येथून अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी अब्दुल रहमानला राम मंदिरावर हल्ला करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, १९ वर्षीय अब्दुल हा उत्तर प्रदेशातील फैजाबाद (अयोध्या) येथील रहिवासी आहे. तो या हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार होता. त्याचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. काही महिने त्याला प्रशिक्षणही देण्यात आले होते. यानंतर आता दोन हँड ग्रेनेड देऊन त्याला मंदिरावर हल्ला करण्यासाठी पाठवले होते. मात्र, यापूर्वीच फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली.

चौकशीत या महत्वाच्या गोष्टींचा खुलासा - 
चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर, मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्यासाठी त्याचे  ब्रेनवॉश करण्यात आले होते. अयोध्येतील मिल्कीपूर येथे दुकान चालवणारा अब्दुल रहमान हा बऱ्याच दिवसांपासून राम मंदिरची रेकी करत होता. एवढेच नाही तर, राम मंदिर उडविण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता, असा खुलासाही त्याने केला आहे.

आयएसच्या इस्लामिक स्टेट खुरासान मॉड्यूलसी संबंधित अब्दुल रहमान हा नाव बदलून मोठा कट रचत होता. त्याने व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने ट्रेनिंग घेतली होती. तो दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्येही गोला होता. आता, या काळात तो कुणाकुणाला भेटला, यासंदर्भात यंत्रणा तपास करत आहेत. 

मोबाईलमध्ये अनेक धार्मिक स्थळांचे व्हडिओ आणि फोटो -
अब्दुलच्या निशाण्यावर केवळ राम मंदिरच नव्हे, तर इतर काही धार्मिक स्थळेही होती. त्याच्या मोबाईलमध्ये काही धार्मिक स्थळांचे फटो आणि व्हिडिओदेखील मिळाले आहेत. यासंदर्भातही त्याची कसून चौकशी सुरू आहे.

राम मंदिर आणि परिसराचे फुटेजही तपासले जातायत - 
माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहिती नुसार, सुरक्षा एजन्सी राम मंदिर आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासणार आहेत. राम मंदिराच्या रेकी शिवाय अब्दुल कुठे कुठे गेला आणि त्याच्यासोबत कोण कोण होते, हे याचीही चौकशी केली जात आहे. गुजरात एटीएस आणि पलवल एसटीएफ या प्रकरणाचा तपास करत आहेत. 
 

Web Title: abdul rehman brainwashed for attack on ayodhya ram mandir ram temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.