अबब...गुजरातमध्ये अजगराने गिळली चक्क नीलगाय

By Admin | Published: September 21, 2016 03:25 PM2016-09-21T15:25:10+5:302016-09-21T15:25:10+5:30

असं म्हणतात की अजगर स्वतःपेक्षा दुप्पट आकाराचे सावज अगदी सहजपणे खाऊ शकतो आणि आरामात ते पचवूही शकतो. मात्र, गुजरातच्या गीर जंगलातील या अजगराला

Abh ... In Gujarat, the dragon swallows the nilgai | अबब...गुजरातमध्ये अजगराने गिळली चक्क नीलगाय

अबब...गुजरातमध्ये अजगराने गिळली चक्क नीलगाय

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

जुनागड, दि. 21- क्षमतेपेक्षा जास्त काही खाऊ नये अशी इंग्रजीत म्हण आहे, ती या अजगराच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरते. असं म्हणतात की अजगर स्वतःपेक्षा दुप्पट आकाराचे सावज अगदी सहजपणे खाऊ शकतो आणि आरामात ते पचवूही शकतो. मात्र, गुजरातच्या गीर जंगलातील या अजगराला नीलगायीला गिळणे चांगलेच महागात पडले.

तब्बल 20 फुटी या अजगराने चक्क अख्ख्या निलगायीला गिळंकृत केले. मात्र, त्यानंतर या अजगराची प्रकृती बिघडली.  गीर वन्यजीव अभयारण्यातील बचाव केंद्रात एका शेतक-याने अजगराने गायीला गिळल्याबाबत फोन करून माहिती दिली. या घटनेनंतर या अजगाराला गीर वन्यजीव अभयारण्यातील बचाव केंद्रात ठेवण्यात आले आहे. सध्या बचाव केंद्रातील कर्मचारी अजगराच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
 
 
 

Web Title: Abh ... In Gujarat, the dragon swallows the nilgai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.